कुरकुरीत, खमंग मेदू वड्यांचे नाव काढताच आपल्या सगळ्यांचाच तोंडाला पाणी सुटतं. पण नेहमी नेहमी बाहेरचं खाणं योग्य नाही पण घरी असे पदार्थ बनवायचे म्हटलं की, खूप वेळ लागतो. (Cooking Tips) रात्री डाळ भिजवण्यापासून, सकाळी दळण्याची सगळी तयारी करावी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ब्रेड मेदूवड्याची सोपी रेसेपी सांगणार आहोत. ब्रेड मेदूवडा हा बनवायला अतिशय सोपा असून कमीत कमी वेळात तयार होतो. (How To Make Bread Medu Vada)
ब्रेड मेदूवडा या रेसिपीमध्ये, तुम्हाला चवीसाठी ब्रेड, बटाटा , रवा, दही, तांदळाचे पीठ आणि मसाले यांसारखे रोजचे घरगुती साहित्य आवश्यक असेल. पीठ तयार झाल्यावर तुम्हाला फक्त हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत. फक्त ३० मिनिटात तुम्ही चविष्ट, खमंग वडे बनवू शकता. हे वडे तुम्ही चटणी किंवा सांबारसह खाऊ शकता.
साहित्य
४ ते ५ ब्रेड स्लाईस, २ ते ३ चमचे तांदळाचं पीठ, २ ते ३ चमचे दही, १ ते २ हिरव्या मिरच्या, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, लागेल तेव्हढी कोथिंबीर
कृती
सगळ्यात आधी ब्रेड स्लाईसच्या कडा काढून घ्या. मग ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करा
त्यात हिरवी मिरची बारीक कापून घाला. नंतर दही, तांदूळाचे पीठ, कोथिंबीर, मीठ घालून एकत्र करा. तुम्हाला हवी असल्यास साखर घालू शकता अन्यथा टाळा.
वरील सर्व मिश्रण एकत्र करून छोटे छोटे गोळे करा गाळणीच्या साहाय्यानं मेदूवड्याला पाडतो तसे मध्ये गोल पाडा.
कढईत तेल गरम करून छान वडे तळून घ्या. हे वडे तुम्ही चटणी, सांभारसह खाऊ शकता.
ब्रेड मेदूवडा रेसेपीज (Bread Medu Vada)
1)
2)
3)