Lokmat Sakhi >Food > करा केक न करता बेक! 'नो बेक केक;ची भन्नाट रेसिपी, करा आणि मिळवा तारीफ

करा केक न करता बेक! 'नो बेक केक;ची भन्नाट रेसिपी, करा आणि मिळवा तारीफ

Food and recipe: केक करा आणि तो ही बेक न करता.. आहे की नाही भारी आयडिया... ही घ्या ख्रिसमस स्पशेल केक करण्याची (Christmas special cake recipe) ही सोपी रेसिपी.. आता खूप बेक केल्यामुळे केक करपण्याचं किंवा पुरेसा बेक न झाल्यामुळे तो कच्चा राहण्याचं टेन्शनच नाही.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 03:09 PM2021-12-21T15:09:10+5:302021-12-21T15:30:57+5:30

Food and recipe: केक करा आणि तो ही बेक न करता.. आहे की नाही भारी आयडिया... ही घ्या ख्रिसमस स्पशेल केक करण्याची (Christmas special cake recipe) ही सोपी रेसिपी.. आता खूप बेक केल्यामुळे केक करपण्याचं किंवा पुरेसा बेक न झाल्यामुळे तो कच्चा राहण्याचं टेन्शनच नाही.. 

How to make cake without baking it? Simple recipe of making cake | करा केक न करता बेक! 'नो बेक केक;ची भन्नाट रेसिपी, करा आणि मिळवा तारीफ

करा केक न करता बेक! 'नो बेक केक;ची भन्नाट रेसिपी, करा आणि मिळवा तारीफ

Highlights बेकींग साेडा, बेकींग पावडर असं काहीही नको आणि केकला बेक करणंही नको.. ही घ्या केक करण्याची ही सोपी रेसिपी...

ख्रिसमस म्हणजे केक, कुकीज, कप केक्स असं सगळं आलंच... आता आपण सगळ्यांनीच लॉकडाऊनमध्ये खूप केक रेसिपी (cake without bake recipe) ट्राय केल्या. पण कधी त्या जमल्या तर कधी पार हुकल्या.. केक जमणं किंवा हुकणं याची सगळ्यात जास्त शक्यता दोन वेळा असते. (simple recipe of chocolate cake in Marathi) पहिली शक्यता म्हणजे बेकींग पावडर आणि बेकींग सोडा यांचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे केक न फुगणे किंवा खराब होणे आणि दुसरी शक्यता म्हणजे केक किती वेळ आणि कसा बेक करायचा, गॅस लहान ठेवायचा की मोठा... हे न समजल्यामुळे. 

 

जर या दोन्ही प्रक्रिया केक करण्याच्या रेसिपीतून (chocolate cake recipe in Marathi) काढून टाकल्या, तर केक करणं किती सोपं होईल ना... म्हणूनच तर बेकींग साेडा, बेकींग पावडर असं काहीही नको आणि केकला बेक करणंही नको.. ही घ्या केक करण्याची ही सोपी रेसिपी... यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने ही सोपी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघायला हरकत नाही... ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या (instagram)  homecookingshow या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

केक करण्यासाठी लागणारं साहित्य
ingredients for making cake

४०० ग्रॅम बिस्किटे, १५० ग्रॅम साखर, ५० ग्रॅम कोको पावडर, २०० मिली पाणी, १५० ग्रॅम बटर, १ टी स्पून व्हॅनिला इसेंन्स, १ कप अक्रोड, चॉकलेट गॅनेच (Chocolate Ganache) बनविण्यासाठी १ कप म्हणजेच २०० मिली फ्रेश क्रिम, २०० ग्रॅम डार्क चॉकलेट.

कसा करायचा केक?
How to make cake without baking it?

- केक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये बिस्किटाचे छोटे- छोटे तुकडे करून घ्या. खूप बारीक काप करू नका.
- त्यानंतर एका पॅनमध्ये अक्रोडचे बारीक काप करून टाका आणि एखादा मिनिट थोडे रोस्ट करून घ्या. यातले अर्धे बिस्किटाच्या तुकड्यात टाका आणि अर्धे बाजूला राहू द्या.


- यानंतर आता पॅनमध्ये साखर आणि कोको पावडर टाका आणि व्यवस्थित हलवून एकत्र करा.
- यामध्ये आता पाणी टाका आणि मिश्रण हलवत रहा. ही प्रकिया करताना गॅस मंद किंवा मध्यम ठेवा.
- आता त्यात बटर टाका आणि पुन्हा एकदा मिश्रण चांगले हलवा. त्यात व्हॅनिला इसेन्स टाका. हे मिश्रण चार ते पाच मिनिटे उकळू द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा.
- हे मिश्रण जेव्हा रूम टेम्परेचरवर येईल तेव्हा ते बाऊलमध्ये असलेल्या बिस्किटाच्या तुकड्यांमध्ये टाका. सगळं व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. 
- त्यानंतर केक ज्या भांड्यात बनविता त्याला सर्व बाजूंनी तूपाचा हात फिरवा आणि हे मिश्रण त्या भांड्यात टाका. 
- मिश्रणावर हलक्या हाताने चमच्याने दाब द्या, जेणेकरून ते एकसमान होईल.


- यानंतर हे ३० मिनिटांसाठी रेफ्रिजरेट (refrigerate) करायला ठेवा.
- तोपर्यंत या केकसाठी चॉकलेट गॅनेच (Chocolate Ganache) तयार करून घ्या. त्यासाठी एका पॅनमध्ये फ्रेश क्रिम टाका आणि त्यात डार्क चॉकलेटचे तुकडे टाका. चॉकलेट वितळून स्मुथ मिक्स्चर तयार होईपर्यंत गॅस चालू ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा.
- आता फ्रिजरमधला केक बाहेर काढा आणि तयार केलेला हा Chocolate Ganache केकवर टाका. तो समप्रमाणात पसरला जाईल याची काळजी घ्या. आता पुन्हा एकदा हे मिश्रण ३ ते ४ तासांसाठी रेफ्रिजरेट करा...
- त्यानंतर केक टिनमधून केक अगदी आरामात बाहेर निघेत. त्यावर अक्रोड किंवा तुमचे आवडते ड्रायफ्रुट्स टाकून डेकोरेट करा. मस्त चॉकलेट केक खाण्याचा आस्वाद घ्या.. 
 

Web Title: How to make cake without baking it? Simple recipe of making cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.