Join us  

Carrot cake recipe: लालचुटुक गाजराचा मऊमऊ केक; केक खावा तर असा! घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 1:40 PM

How to make carrot cake: सध्या बाजारात भरपूर गाजरं मिळत आहेत. गाजराचा हलवा, गाजराचं लोणचं असं सगळं करून झालं असेल तर आता गाजराचा हा सुपर स्पाँजी केक करून बघा.... मुलांनाही नक्कीच आवडेल.

ठळक मुद्देआपण मैद्यापासून नाही तर कणकेपासून म्हणजेच गव्हाच्या पीठापासून केक करणार आहोत.

व्हॅनिला केक, चॉकलेट केक, बिस्किट केक असे केकचे प्रकार तुम्ही नक्कीच खाल्ले असणार. आता ही एक नवी भन्नाट रेसिपी (simple cake recipe) करून बघा.. गाजर केक... एरवी जर गाजर खायला मुलं नाही म्हणत असतील तर केकच्या माध्यमातून गाजरं आपोआप त्यांच्या पोटात जातील. शिवाय हा केक अतिशय हेल्दी आहे. कारण आपण मैद्यापासून नाही तर कणकेपासून म्हणजेच गव्हाच्या पीठापासून केक (cake recipe with wheat aata) करणार आहोत. गाजर आणि कणिक यांच्यापासून तयार केलेला हा केक (Christmas special recipe) म्हणूनच तर अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. त्यामुळेच तर बघा एकदा ट्राय (healthy carrot cake) करून ही गाजर केक रेसिपी. आणखी एक गोष्ट म्हणजे कुकरमध्येही हा केक करता येतो. 

 

गाजराचा केक करण्यासाठी लागणारं साहित्य ingredients for carrot cakeपाऊण कप दूध, अर्धा कप पिठीसाखर, १/४ कप तेल, १ कप कणिक, १ टीस्पून बेकींग पावडर, अर्धा टीस्पून बेकींग सोडा, अर्धा कप किसलेलं गाजर, २ टेबलस्पून अक्रोड, बदाम, मणुके असे तुमचे आवडीचे ड्रायफ्रुट्स

How to make cake in cooker: ओव्हन नाही, कुकर तर आहे? करा कुकरमध्ये केक, सॉफ्ट-स्पॉंजी-सोपा!

कसा करायचा केक?How to make carrot cake?- सगळ्यात आधी तर आपल्याला ज्या कुकरमध्ये केक तयार करायचा आहे, त्या कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि आतली वायर काढून टाका.- यानंतर कुकरमध्ये एक मध्यम आकाराची वाटी भरून मीठ टाका. त्यावर आपण गरम भांडी किंवा कढई ठेवण्यासाठी जे स्टॅण्ड वापरतो ते स्टॅण्ड ठेवा.- आता मध्यम आचेवर गॅस लावा आणि त्यावर हे कुकर झाकण लावून ठेऊन द्या. १० मिनिटे कुकर याच अवस्थेत ठेवा. यालाच आपण प्री हीट (pre heat cooker for making cake) करणे असे म्हणतो.

- आता केक बनविण्यासाठीचं सगळं साहित्य एका खोलगट बाऊलमध्ये एकत्र करून घ्या.- मैदा, पिठीसाखर, बेकींग पावडर, बेकींग सोडा हे सगळं साहित्य चाळणीने चाळूनच घ्यावे.- आता दूध टाका आणि सगळे मिश्रण छान फेटून घ्या.- पीठात गोळे राहणार नाहीत, याची काळजी घ्या.

 

video credit- Kitchen Time with Neha

- भजे करण्यासाठी जस सैलसर, पातळ पीठ असतं, तसंच केकसाठी असावं. खूप घट्टही नको आणि अगदीच पाणीदारही नको.- ज्या भांड्यात केक लावणार आहात त्या भांड्याला तुपाचा हात फिरवा. त्यात थोडा मैदा टाका आणि तो डबा हलवून घ्या. जेणेकरून पिठाचा पातळसा थर सगळ्या भांड्याला लागेल. यालाच ग्रिसिंग करणं असं म्हणतात.- आता आपण केकचं मिश्रण या भांड्यात टाका. भांडे दोन- तीन वेळा थोडे वर धरून पुन्हा आपटा. यामुळे मग मिश्रणात काही एअर बबल असल्यास निघून जातात.

- आता हे भांडे प्री हिटसाठी ठेवलेल्या कुकरमध्ये अलगद ठेवा.- कुकरचे झाकण लावा. २५ मिनिटे मध्यम ते मोठा या स्वरूपाचा गॅस ठेवा.- त्यानंतर पुढची १० मिनिटे कमी ते मध्यम या स्वरूपाचा गॅस असू द्या.- यानंतर एखादी टुथपिक किंवा चाकू केकच्या मधोमध घालून बघा.- जर चाकूला किंवा टुथपिकला चिकट पीठ लागले नाही, तर आपला केक झाला असे समजावे.- गॅस बंद करा. केकचे भांडे बाहेर काढा. केक थोडा थंड झाला की आजूबाजूने चाकू टाकून त्याचे काठ मोकळे करून घ्या.- नंतर भांडे उपडे करा आणि अलगद केक बाहेर काढून घ्या.

image credithttps://www.blog.birdsparty.com/2021/03/carrot-cake-cream-cheese-frosting-recipe.html

https://www.inspiredtaste.net/25753/carrot-cake-recipe/

टॅग्स :अन्नपाककृतीनाताळआरोग्यकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.