हिवाळा म्हणजे भाज्या, फळे यांचा सुकाळ. या दिवसांत बाजारातून एक चक्कर जरी मारली तरी हिवाळ्यातलं हे वैभव (winter food) आपल्या लक्षात येतं... याच ऋतूत केशरी, लालसर गाजरं देखील बाजारात मुबलक प्रमाणात आलेली असतात. म्हणूनच तर मग घरोघरी गाजराचा हलवा, गाजराचं लोणचं, गाजराची कोशिंबीर असं काही काही सुरू होऊन जातं...
लिंबाचं, कैरीचं लोणचं यांचं राज्य अबाधित असलं तरी गाजराच्या लोणच्याची (carrot pickle recipe in Marathi) मजा मात्र वेगळीच आहे. जेवणात हे लोणचं तोंडी लावायला घेतलं तर जेवणाची मजाही निश्चितच वाढते.. म्हणूनच तर मग करून बघा हे चटकदार, पौष्टिक गाजराचं लोणचं...
गाजराचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्यIngredients for Carrot Pickle १ किलो गाजर, मोहरीचं तेल पावशेर, आलं आणि लसूणाचे बारीक तुकडे २ टेबलस्पून, अर्धा कप गरम मसाला, अर्धा कप लाल तिखट, गुळ चार कप, मोहरीची डाळ अर्धा कप, ५ ते ६ लिंबांचा रस, चवीनुसार मीठ.
कसं करायचं गाजराचं लोणचं?How to make carrot pickle?- सगळ्यात आधी तर गाजर धुवून घ्या. कपड्याने पुसून कोरडे करा. - लोणच्यासाठी तुम्हाला आवडतील तशा गाजराच्या फोडी करून घ्या.- त्यानंतर तेल कढईत गरम करा. त्यात लसूण, आले टाका.- आता त्यातच चिरलेलं गाजर, मसाला, लाल तिखट, मोहरीची डाळ, गुळ आणि लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाका.
video credit: Sujata's Pakkruti
- हे लोणचं व्यवस्थित मिक्स करा आणि काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवा. - एक- दोन दिवस हे लोणचे रूम टेम्परेचरमध्ये ठेवा. - त्यानंतर ते सेट झाले की फ्रिजमध्ये ठेवून द्या. जेणेकरून ते अधिक काळ टिकेल.- लोणच्यात तेल भरपूर असेल याची काळजी घ्या. तेल कमी पडत आहे, असं वाटलं तर पुन्हा थोडे तेल गरम करा आणि ते कोमट झाल्यावर लोणच्याच्या बरणीत टाका.
गाजर खाण्याचे फायदे Benefits of eating carrot- गाजरात खूप जास्त फायबर्स असतात. त्यामुळे वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्यांनी गाजर नियमित खावं.- याशिवाय गाजरामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शियम यांचेही चांगले प्रमाण असते.- रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गाजर उपयुक्त आहे.- पोटात जंत झाले असल्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास गाजराचा एक कप ज्यूस घ्यावा. - दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी गाजर खाणे उपयुक्त ठरते.