Join us  

ख्रिसमस आणि न्यू इअर स्पेशल ड्राय फ्रुट केक अजून केला नाही? सोपी रेसिपी, करा झटपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 7:11 PM

How to make dry fruit cake: ख्रिसमस आणि इयर एन्ड सेलिब्रेशन (Christmas special cake) म्हटलं की केक कटींग तर झालंच पाहिजे... मग यासाठी घरच्या घरी मस्त स्पेशल ड्राय फ्रुट्स केक (dry fruits cake) करता आला तर क्या बात है... म्हणूनच तर ही घ्या रेसिपी...

ठळक मुद्देख्रिसमस, थर्टी फर्स्ट यानिमित्ताने तुम्ही कुणाच्या घरी जाणार असाल, तर त्यांच्याकडेही तुम्ही हा होम मेड केक घेऊन जाऊ शकता. 

ख्रिसमस, इयर एन्ड किंवा वाढदिवस अशा निमित्ताने केक आणलेही जातात किंवा घरीही केले जातात. पण एरवीही मुलांना काही वेगळं खाण्याची इच्छा झाली तर आपण त्यांना साधा- साेपा ड्रायफ्रुट केक नक्कीच बनवून देऊ शकतो. म्हणूनच तर यावेळी ख्रिसमसच्या निमित्ताने करून बघा हा सोपा केक. केक बनविण्याची रेसिपी (dry fruit cake recipe) अतिशय सोपी आहे आणि विशेष म्हणजे ओव्हन, मायक्रोव्हेव नसतानाही तुम्ही कुकरमध्ये (dry fruit cake in cooker) अगदी सहजपणे हा केक बनवू शकता. ख्रिसमस, थर्टी फर्स्ट यानिमित्ताने तुम्ही कुणाच्या घरी जाणार असाल, तर त्यांच्याकडेही तुम्ही हा होम मेड केक घेऊन जाऊ शकता. 

 

ड्राय फ्रुट केक करण्यासाठी लागणारं साहित्य१ कप मैदा, १ कप मिल्क पावडर, १ कप दूध, १ कप पिठी साखर. ४ ते ५ थेंब व्हॅनिला इसेंस, १ टीस्पून बेकींग पावडर, अर्धा टी स्पून बेकींग सोडा, १ टेबल स्पून लिंबाच रस, ४ चमचे वितळलेलं तूप आणि बदाम, काजू, मणूके, पिस्ते, अक्रोड यांचे काप अर्धा कप.

Carrot cake recipe: लालचुटुक गाजराचा मऊमऊ केक; केक खावा तर असा! घ्या सोपी रेसिपी

कसा करायचा ड्रायफ्रुट केक ?How to make dry fruit cake- सगळ्यात आधी कुकरची शिटी आणि वायर काढा. कुकरमध्ये एक वाटी मीठ टाका. त्यात थोडे उंच होईल असे स्टॅण्ड किंवा वाटी ठेवा आणि हे कुकर झाकण लावून मध्यम गॅसवर १० मिनिटे प्री हिट करायला ठेवा.- त्यानंतर मैदा, पिठीसाखर, तूप, दूध, इसेंस, बेकींग पावडर, बेकींग सोडा हे सगळे साहित्य एका बाऊलमध्ये टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून सैलसर पीठ तयार करून घ्या.

- ज्या डब्यात केक लावणार आहात त्याला बटर आणि मैदा लावून ग्रिसींग करून ठेवा.- त्यात आता केकचे मिश्रण टाका आणि हा डबा प्री हीट साठी ठेवलेल्या कुकरमध्ये ठेवा..- सुरुवातीला २५ मिनिटे गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा.

video credit- Arunima Bakes

- त्यानंतर पुढच्या १० मिनिटांसाठी गॅसची फ्लेम लहान ते मध्यम ठेवा.- त्यानंतर केकच्या मध्यभागी टुथपिक किंवा चाकू टाका आणि केक चांगला बेक झाला आहे की नाही हे तपासा.- चाकूला किंवा टूथपिकला जर चिकट ओलसर पीठ चिटकले नाही, तर केक छान बेक झाला आहे हे समजावे आणि गॅस बंद करावा.- केक रूम टेम्परेचरला आल्यावर डब्यातून बाहेर काढा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नाताळनववर्ष