शुभा प्रभू साटम
वर्षाखेरीस अनेकजण घरी येतात. आपण छोटी पार्टी अरेंज करतो. मुलांसाठी काहीतरी छोटी पार्टी करतो. मग अशावेळी फार दमायचं पण नसतं पण काहीतरी खासपण हवंच असतं. त्यासाठी हा पदार्थ. ‘पूल अपार्ट गार्लिक चीज ब्रेड’. ही कृती पूर्ण परदेशी आहे, तिथं पार्टी असताना, स्नॅक्ससाठी असा चीझ गार्लिक ब्रेड ग्रील करून ठेवतात, तुकडा खेचायचा आणि फस्त करायचा. खरं तर लसूण, चीझ घालून हा ब्रेड बेक केला जातो,पण सगळीकडे ओव्हन असतोच असं नाही. तुमच्याकडेही ओव्हन नसला तरी घरी हा ब्रेड बनवताच येऊ शकतो. तो ही आपल्या तव्यावर. (how to make garlic cheese bread on Tawa)
आपण घरी हा मस्त प्रकार कसा करायचा ते बघू..
(Image : Google)
साहित्य
बेकरीत स्लाईस न केलेला असा ब्रेड लोफ मिळतो तो
समजा नाही मिळाला तर आपली पावाची लादी असते ना ती घ्या. फक्त अखंड ठेवा,तुकडे करू नका.
ब्रेड लोफ /पाव लादी.
लसूण दहा ते पंधरा पाकळ्या किंवा आवडतील तशा.
बटर
चीज स्लाईस माणशी एक स्लाईस
असल्यास फ्रेश हॅर्ब्स नाहीतर ड्राय हॅर्ब्स/पिझा /पास्ता मसाला.
कांदा पात
रेड चिली फ्लेक्स
(Image : Google)
कृती
लोफला उभ्या आडव्या चिरा मारा, तुकडे होता नयेत
लादी असेल तर अलगद वरचेवर उभे आडवे असे कापून घ्या.
लसूण+ हॅर्ब्स + थोडे बटर यांना प्रोसेसर मधून फिरवून घ्या, प्रोसेसर नसेल तर बारीक चिरलेला लसूण+ आणि बाकी व्यवस्थित एकत्र करून घ्या.
मोठा तवा तापत ठेवा.
पावाच्या खाचात बटर लसूण कांदा पात हे मिश्रण ओता,आणि चिजचे तुकडे खोचून ठेवा.
हा लोफ अलगद तव्यावर ठेवून मंद आगीवर चीज वितळेपर्यंत शेकवून घ्या.
ओव्हन असेल तर ग्रील करा.
(Image : Google)
साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटात मस्त खमंग नाश्ता तयार.
प्लेट मध्ये काढून सर्व्ह करा.
वरून हवं तर चीज किसून घाला.
मुलांच्या पार्टीसाठी एकदम हटके आयटम आहे.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)