Join us  

थंडीत इडलीचे पीठ अजिबात फुगत नाही? १ ट्रिक, पीठ फुगेल मस्त, करा हलक्या पांढऱ्याशुभ्र इडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:47 PM

How Make Idli Batter at Home (Idliche pith kase Aambvayhe) : इडलीचे पीठ दळण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत बेसिक स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होईल.

हिवाळ्यात इडलीचे (Idli) पीठ फुलवायचे म्हणजे एक मोठा टास्क असतो. (Cooking Hacks) विकतचा इडली सांबार नेहमी चवदार, चविष्ट लागतो.  इडल्या घरी करायचं म्हटलं तर खूपच कष्ट घ्यावे लागतात. इडलीचे पीठ व्यवस्थित  दळल्यानंतरही व्यवस्थित फुलत नाही ना पिठाला आंबटपणा येतो. (Idliche pith kase karayche) इडलीचे पीठ आंबववण्यासाठी तुम्ही काही सोप्या कुकिंग टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होईल. इडलीचे पीठ दळण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत बेसिक स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होईल. (How to Make Idli Batter Perfect Soft Idli Recipe)

इडलीचे पीठ तयार करण्याचे साहित्य

इडलीचे तांदूळ- ४ कप

उडीद डाळ- १ कप

पोहे- अर्धा कप

मेथी दाणे- १ टिस्पून

इडलीचे पीठ करण्याची कृती (Idli Batter Making Steps)

१) सगळ्यात आधी इडलीचा तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीच्या बीया २ वेळा स्वच्छ धुवून घ्या.  इडलीचे पीठ फुलून येण्यासाठी सगळ्यात आधी २ वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. 

२) १ वाटी उडीदाची डाळ धुवून घ्या. त्यात चमचाभर मेथी घाला. सर्व पदार्थ व्यवस्थित धुवून झाकण ठेवून भिजवून घ्या ठेवा. ५ ते ६ तास भिजवल्यानंतर हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे वाटून घ्या नंतर एकजीव करा. यात तुम्ही भिजवलेले पोहे दळून घालू शकता.

१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा

३) पीठ दळून झाल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून ८ ते ९ तासांसाठी हवाबंद डब्यात आंबवण्यासाठी ठेवा. मीठ आंबवून झाल्यानंतर त्यात चमचाभर मीठ, चमचाभर बेकिंग सोडा घालून मिश्रण ढवळून घ्या. एका इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात इडलीचे मिश्रण घाला. 

४) १० ते १५ मिनिटांसाठी इडल्या वाफेवर शिजवून घ्या. तयार आहेत गरमागरम इडल्या

इडलीचे पीठ परफेक्ट येण्यासाठी टिप्स (Perfect Idli Batter Making Tips)

१) चांगल्या गुणवत्तेच्या उडीदाच्या डाळीचा वापर करा.  घरात पडून असलेल्या जुन्या डाळीचा वापर इडली बनवण्यासाठी करू नका नवी स्वच्छ डाळ वापरा.

साखर-गूळ न घालता करा पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू; हिवाळ्यात रोज १ लाडू खा-हाडं होतील स्ट्राँग

२) इडलीसाठी इडलीचे तांदूळ किंवा छोट्या दाण्याच्या तांदळाचा वापर करा. इडलीच्या पीठात थोडी कसुरी मेथी घातली तर टेकस्चर खूप छान येते.

३) इडलीच्या पीठात शिजवलेला भात दळून घातला तरी त्याची छान चव येते. तुम्ही यात १ कप इडली रव्याचा वापरही करू शकता.  इडली करण्यासाठी बिना आयोडाईज्ड सैंधव मीठाचा वापर करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स