हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात फ्रेश भाज्या खासकरून गाजर, मटार, पालेभाज्या दिसायला सुरूवात होते. मटार पनीर, मटार पुलाव असे अनेक पदार्थ घराघरात बनवले जातात. (Cooking Tips) पण संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा दिवसभरात कधीही भूक लागल्यानंतर चटपटीत, कुरकुरीत काहीतरी खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. म्हणून आज तुम्हाला मटार कचोरी बनवण्याची सोपी रेसेपी सांगणार आहोत. (Matar Kachori Recipe) मटार कटोरीनं खाल्लानं तुम्हाला पौष्टीक घटक तर मिळतीलच याबरोबर मानसिक आनंदही मिळेल. (How to make perfect matar kachori)
स्वादिष्ट, खुसखुशीत कचोरीसाठी या टिप्स
-जेव्हा तुम्ही मटर की कचोरी बनवाल तेव्हा ती स्वादिष्ट असावी असा प्रयत्न करा. कचोरीचे सारण तयार करताना मटार थोडे वाफवून घ्या आणि ते उकळल्यानंतर चांगले मॅश करा.
- वाटाण्याच्या पेस्टच्या मध्यभागी कधीही जाड तुकडा नसावा, अन्यथा जेव्हा तुम्ही पीठ आत भराल तेव्हा कचोऱ्या लाटताना तुटायला लागतील.
- कचोरीचे पीठ मळताना त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालावे आणि तेलाचं मोहन कुरकुरीत होण्यासाठी घाला. पीठ मळताना थोडे तेल टाकावे लागेल. तेल मिक्स करताना, पीठ व्यवस्थित मऊ झाले आहे का ते आपल्या हातानं पाहा. पीठ मळून घेतल्यानंतर, किमान 15 मिनिटे झाकून ठेवा.
- वेळेच्या कमतरतेमुळे मटर की कचोरी बनवणं अनेकांना अवघड वाटंत. झटपट कचोरी बनवायची असल्यास, पीठ वेगळे बनवण्याऐवजी, पीठात वाटाणा पेस्ट मिसळून पीठ मळून घ्या आणि कचोरीचा आकार देऊन हलक्या हातांनी लाटून तयार करा. या युक्तीने तुम्ही अगदी कमी वेळात क्रिस्पी मटर की कचोरी तयार करू शकता.
या चुका टाळा
- मटर कचोरी बनवताना मटारचे सारण गरम वापरू नये. सारण भरण्यापूर्वी पूर्णपणे थंड करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही घाईत कचोर्या बनवत असाल आणि सारण गरम असेल तर फ्रीझरमध्ये ५ मिनिटे ठेवा आणि थंड झाल्यावर कचोर्या बनवा. कचोरीचं पीठ मळताना जास्त पाणी वापरू नका आणि योग्य प्रमाणात तेल वापरा.
-कचोरी तळण्यासाठी, प्रथम गॅसवर तेल गरम करा, नंतर रोल केलेली कचोरी पॅनमध्ये ठेवा आणि मंद आचेवर तळा . कचोरीत कधीच जास्त सारण भरू नका अन्यथा तळताना फुटण्याची शक्यता असते.
१)
२)
३)