काचेच्या बरणीत भरलेला पिवळट, चॉकलेटी मुरंबा पाहिला की पटकन तोंडात टाकावासा वाटतो.. आवळा हा मुळातच पौष्टिक आणि पाचक असतो. त्यात जेव्हा आपण त्याचा मुरंबा किंवा माेरावळा बनवतो, तेव्हा त्याची पौष्टिकता खूप जास्त वाढते. एकदा मोरावळा बनवला की तो वर्षभर चांगला टिकतो. रोज एक चमचा मोरावळा म्हणजे घरच्या घरी तयार केलेले टॉनिक (healthy tonic)... मोरावळा किंवा मुरंबा बनविण्याच्या अनेक रेसिपी (aamla muramba recipe)आहेत. यावर्षी ही एक रेसिपी (How to make moravala/muramba?) ट्राय करा आणि छान, चवदार मोरावळा बनवा..
मोरावळा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
दिड कप आवळ्याचे तुकडे, दिड कप साखर, ३/४ कप पाणी, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर, ४ ते ५ लवंगा, १ टी स्पून विलायची पावडर.
आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी!
कसा करायचा मोरावळा किंवा मुरंबा
How to make aamla moravala/muramba?
- मोरावळा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आवळे स्वच्छ धुवून कापून घ्या.
- आवळे कापण्याच्या दोन पद्धती आहेत. कुणी कुणी आवळ्याच्या पुर्ण फोडी करतात आणि बिया काढून टाकतात. तर कुणी आवळा पुर्णपणे कापत नाहीत. केवळ त्याला थोडे छेद देतात, बिया आवळ्यामध्ये तशाच राहतात. त्यामुळे यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल, त्यानुसार आवळे कापून घ्या.
- कुकरमध्ये पाणी टाका. कापलेले आवळे कुकरमध्ये एका भांड्यात ठेवा. त्यावर झाकण ठेवा. आवळ्यात पाणी टाकू नका. वाफेवर आवळे शिजतील. दोन- तीन शिट्टया झाल्या की गॅस बंद करा.
- तोपर्यंत दुसरीकडे एका कढईत साखर (sugar) आणि पाणी एकत्र करा आणि पाक तयार करा. पाक तयार करण्यासाठी साखर जेवढी घेतली असेल, त्याच्या निम्मे पाणी घ्यावे. पाक तयार करतानाच त्यात दालचिनी, लवंगा घाला. एकतारी पाक तयार झाला की त्यात शिजलेले आवळ्याचे तुकडे घाला आणि ८ ते १० मिनिटे शिजू द्या.
- आवळ्याचा रंग बदलू लागला की गॅस बंद करा. काचेच्या बरणीत मुरंबा भरून ठेवा.
- पाक चांगला पक्का झाला तर मोरावळा वर्षभर चांगला टिकू शकतो.
- मोरावळा खराब होतो आहे असे वाटले, तर तो फ्रिजमध्येही ठेवू शकता.
video credit- Kabitaskitchen
आवळा मुरंबा खाण्याचे फायदे
Benefits of eating aamla muramba
- आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी (vitamin c) आणि अँटीऑक्सिडंट्स (anti oxidants) आहेत. हे सर्व घटक रोगप्रतिकारक शक्ती (immunity)वाढविण्यास उपयुक्त ठरतात.
- मुरंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या (aging effect) येणे कमी होते आणि चेहरा तजेलदार होतो.
- ॲसिडीटीचा (acidity) त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे मुरंबा खावा.
- भुक वाढण्यासाठी मुरंबा उपयुक्त ठरतो.
- मोरावळा नियमित खाल्ल्याने पचनशक्ती (digetion)चांगली होते.
- केसांचे आरोग्य (hair care)सुधारण्यासाठी मोरावळा उपयुक्त ठरतो.
- मोरावळा नियमितपणे खाल्ल्याने शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स (body detox) होते. त्यामुळे रक्त शुद्ध होते.