Lokmat Sakhi >Food > Besan ladoo recipe in marathi : बेसनाचे लाडू बिघडतात? बेसन भाजण्याच्या 'या' खास पद्धतीनं बनवा परफेक्ट चविष्ट लाडू

Besan ladoo recipe in marathi : बेसनाचे लाडू बिघडतात? बेसन भाजण्याच्या 'या' खास पद्धतीनं बनवा परफेक्ट चविष्ट लाडू

How to make perfect besan laddu : चवदार, स्वादिष्ट फराळाचा डबा लगेच रिकामा होतो. बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:11 PM2021-10-26T19:11:24+5:302021-10-27T10:00:24+5:30

How to make perfect besan laddu : चवदार, स्वादिष्ट फराळाचा डबा लगेच रिकामा होतो. बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.

How to make perfect besan laddu : Avoid these mistakes while making besan ladoo | Besan ladoo recipe in marathi : बेसनाचे लाडू बिघडतात? बेसन भाजण्याच्या 'या' खास पद्धतीनं बनवा परफेक्ट चविष्ट लाडू

Besan ladoo recipe in marathi : बेसनाचे लाडू बिघडतात? बेसन भाजण्याच्या 'या' खास पद्धतीनं बनवा परफेक्ट चविष्ट लाडू

दिवाळीत घरच्याघरी एकाचवेळी नवनवीन पदार्थ खाण्याचा आनंद लुटता येतो. (Diwali Faral) लाडू, चिवडा, चकली. शंकरपाळे हे पदार्थ पाहताच तोंडाला पाणी सुटंत. पण गंमत म्हणजे फराळ बनवताना एखादा पदार्थ बिघडला किंवा त्यात काही कमी  जास्त झालं तर तो पदार्थ आपण इतरांना देऊही नाही शकतं. तसंच घरची मंडळीही खाण्यासाठी फारशी उत्साही नसतात.

चवदार, स्वादिष्ट फराळाचा डबा लगेच रिकामा होतो. बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. बेसनाचे लाडू बनवताना काही कॉमन चुकान अनेकजणी  करतात त्यामुळे लाडू बिघडतात. म्हणूनच आज आम्ही बेसन लाडू बनवताना कोणत्या चुका टाळायच्या ते सांगणार आहोत. (How to make perfect besan laddu) 

बेसनाचं पीठ भाजताना या चुका टाळा (Mistakes you should avoid 

बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसन चांगले भाजून घ्यावे लागते. यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे अनेक स्त्रिया उच्च किंवा मध्यम आचेवर बेसन भाजतात पण ही पद्धत चुकीची आहे. बेसन जास्त किंवा मध्यम आचेवर भाजून घेतल्यास बेसन कुठे चांगले भाजले जाते, तर कुठेतरी कच्चे राहते. अनेकवेळा बेसन मोठ्या आचेवर भाजल्यावर तेही जळून जाते. यामुळे लाडूंची चव बिघडते, तर बेसनाचे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ते घश्याला चिकटते.

बेसनात तूप घालताना कोणती काळजी  घ्याल

जर चांगल्या तुपाचे बेसन लाडू बनवत असाल तर कढईत सर्व तूप एकाच वेळी टाकू नये. बेसनाला आधी थोडे तूप घालून तळून घ्या, जेव्हा तुम्हाला गरज वाटली किंवा बेसन कोरडे दिसले तर त्यात आणखी थोडं तूप टाका. बेसनाच्या पिठाचा सुगंध यायला लागला आणि त्याचा रंग हलका तपकिरी झाला, तर समजून घ्या की बेसन चांगले भाजले आहे.

बेसनाचे लाडू बांधण्यासाठी अनेक स्त्रिया वरती तूप मिसळतात. असे अजिबात करू नका, यामुळे लाडूंची चव खराब होऊ शकते. जर तुम्हाला चांगले बेसन लाडू खायचे असतील तर बेसन चांगले भाजून घेतल्यावर त्यात थोडे पाणी शिंपडा आणि बेसन 2 ते 3 मिनिटे आणखी परतून घ्या म्हणजे त्याचे पाणी व्यवस्थित सुकून जाईल. असे केल्याने बेसन लाडू परफेक्ट होतात.

बेसनात साखर घालताना अशी घ्या काळजी

तुम्ही साखर पावडर घरी बनवू शकता किंवा पाकही तयार करू शकता. हे करण्यासाठी, आपल्याला एका पॅनमध्ये पाणी आणि साखर शिजवावे लागेल जेव्हा सिरप तयार होईल तेव्हा साखर पूर्णपणे वितळलेली असेल. त्यातही थोडं तूप मिसळा म्हणजे शुगर सिरपमध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि मग थंड होऊ द्या.

बेसनाच्या पिठात गरम पाक चुकूनही मिसळू नका किंवा गरम बेसनामध्ये साखर पावडर मिसळू नका. असे केल्याने साखरेतून पाणी सुटते आणि बेचव  होते, ज्यामुळे लाडू वळणं कठीण होतं. बेसन लाडू तयार झाल्यावर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवावेत, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यास ते कडक होतात.

(Image credit- Spicecravings.com)

बेसन लाडूंची रेसेपी (Besan Laddu Recipe)

1)

2)

Web Title: How to make perfect besan laddu : Avoid these mistakes while making besan ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.