थंडीचा मौसम (winter special) म्हणजे वेळोवेळी मस्त मसाला घातलेला झकास चहा तर हवाच.. कुडकुडणारी थंडी आणि हातात गरमागरम चहाचा कप... असं मस्त टायमिंग जमून आलं तर चहाप्रेमींना आणि दुसरं काय हवं.. म्हणूनच तर पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतुंमध्ये अनेक जणांची चहाशी विशेष गट्टी (tea lover) जमून येते. आता चहा म्हटलं की मसाल्याचा चहा, अद्रक घातलेला, विलायची किंवा सुंठ घातलेला चहा, दालचिनी लवंग टाकून केलेला कडक चहा (special tea)... असे प्रकार आपण ऐकलेलेही असतात आणि पिऊनही पाहिलेले असतात. पण केशर घातलेला चहा (keasr tea: perfect tea recipe for tea lover) तुम्ही पाहिला किंवा घेतला आहे का? (Shahi Rajwadi chai recipe in marathi) हा चहा चाखून पाहिल्यानंतर चहाप्रेमी (chai recipe for World Tea Day) अतिशय खुश झालेले आहेत बरं का..
केशर घातलेल्या या शाही राजवाडी चहाची रेसिपी (instagram) इन्स्टाग्रामच्या chaharcooking या पेजवर शेअर करण्यात आली आहे. या चहामध्ये केशर तर आहेच पण त्यासोबतच अनेक मसाल्यांचा वापरही करण्यात आला आहे. शिवाय चहा करण्याची रेसिपीही अतिशय वेगळी आहे. वेगळी आणि हटके रेसिपी असली तरी ती सोपीच आहे. त्यामुळे हिवाळ्यातल्या एखाद्या निवांत वेळी थंडीने अंग गारठून गेलं असेल तेव्हा हा मस्त चहा करून बघाच.. बघा तरी बासुंदी, रबडी, केशर भात या पदार्थांमधलं केशर जेव्हा आपल्या लाडक्या चहामध्ये येतं, तेव्हा त्याचा स्वाद बहरतो तरी कसा...
शाही राजवाडी चहा करण्यासाठी लागणारं साहित्य
केशर, विलायची, काळे मीरे, लवंग, दालचिनी, बडीशेप, सुंठ, जायफळ, दुध आणि साखर.
कसा करायचा शाही राजवाडी चहा ?
How to make Shahi Rajwadi chai?
- शाही राजवाडी चहा करण्यासाठी सगळ्यात आधी तर विलायची, काळे मीरे, लवंग, दालचिनी, बडीशेप, सुंठ हे सगळे पदार्थ खलबत्त्यात घालून व्यवस्थित कुटून त्याची पावडर करून घ्या.
- यानंतर आता जेवढा चहा बनवायचा आहे तेवढं दूध उकळत ठेवा.
- या चहा मध्ये थेट साखर टाकायची नाही. चहाचा पाक करायचा आणि मग तो चहात टाकायचा.
- त्यामुळे एका पातेल्यात चहामध्ये तुम्हाला जेवढी साखर टाकायची आहे तेवढी साखर टाका आणि साखर गरम करून तिचा पाक करून घ्या.
- आता दुध उकळत आले असेल तर त्यात केशराच्या ३- ४ काड्या टाका.
- यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे तो मसाला टाका. एका कपाला एक टीस्पून एवढा मसाला टाकावा.
- मसाला टाकल्यानंतर दुधात चहा पावडर टाका.
- चहा पावडर टाकल्यानंतर जायफळ किसून टाका.
- आता चहाला उकळी आली की त्यात आपण केलेला साखरेचा पाक टाका.
- चहा मस्त हलवून घ्या आणि गरमागरम चहा कपात ओता.
- चहा कपामध्ये ओतल्यानंतर त्यावर पुन्हा केशराच्या ३- ४ काड्या टाकाव्या आणि गरमागरम चहाचा आस्वाद घ्यावा.