Lokmat Sakhi >Food > करा मिल्क पावडरचे पेढे-गुलाबजाम! मिल्क पावडरचं करायचं काय या प्रश्नाचं चविष्ट उत्तर

करा मिल्क पावडरचे पेढे-गुलाबजाम! मिल्क पावडरचं करायचं काय या प्रश्नाचं चविष्ट उत्तर

 दूध पावडरचा वापर करुन उत्तम चवीच्या अनेक मिठाया तयार करता येतात. यापूर्वी कधीच दुधाच्या पावडरपासून मिठाई तयार केली नसेल तर या तीन पदार्थांनी सुरुवात करा. पेढे, गुलाबजाम आणि नारळाचा पाक या मिठाया दुधाच्या पावडरपासून तयार करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 06:23 PM2021-11-29T18:23:20+5:302021-11-29T18:28:00+5:30

 दूध पावडरचा वापर करुन उत्तम चवीच्या अनेक मिठाया तयार करता येतात. यापूर्वी कधीच दुधाच्या पावडरपासून मिठाई तयार केली नसेल तर या तीन पदार्थांनी सुरुवात करा. पेढे, गुलाबजाम आणि नारळाचा पाक या मिठाया दुधाच्या पावडरपासून तयार करुन पाहा.

How To Make sweets from Milk Powder: Make Milk Powder Pedhe-Gulabjam! Tasteful answer to the question of what to do with milk powder | करा मिल्क पावडरचे पेढे-गुलाबजाम! मिल्क पावडरचं करायचं काय या प्रश्नाचं चविष्ट उत्तर

करा मिल्क पावडरचे पेढे-गुलाबजाम! मिल्क पावडरचं करायचं काय या प्रश्नाचं चविष्ट उत्तर

Highlightsदुधाच्या पावडरपासून अनेक प्रकारच्या मिठाया करता येतात.पेढे आणि गुलाबजाम करताना मिश्रणात गुठळी राहाणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबजामसाठीचं मिश्रण चांगलं पंधरा मिनिटं मळून घ्यावं.

मिठाई खायला कोणाला आवडत नाही? पण बाजारातल्या मिठायाच आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. याला कारण भेसळ. खव्याच्या मिठायांमधे ही भेसळ प्रामुख्याने आढळते. यापासून वाचायचं असेल तर.. मिठाई खाण्याचं सोडा असं नाही. तर घरी तयार केलेली मिठाई खायला सुरुवात करा. पण दुकानांमधे मिळणार्‍या स्वादाची मिठाई आपल्याला कशी बरं जमेल? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे घरात दूध पावडर असेल तर सहज जमेल.

Image: Google

दूध पावडरचा वापर करुन उत्तम चवीच्या अनेक मिठाया तयार करता येतात. यापूर्वी कधीच दुधाच्या पावडरपासून मिठाई तयार केली नसेल तर या तीन पदार्थांनी सुरुवात करा. पेढे, गुलाबजाम आणि नारळाचा पाक या मिठाया दुधाच्या पावडरपासून तयार करुन पाहा. या मिठाया करुन आणि खाऊन बघितल्या तर दुकानातल्या मिठाईला दुधाच्या पावडरपासून घरच्याघरी मिठाईचा पर्याय शोधण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण होईल. दुधाच्या पावडरपासून मिठाई तयार करणं अजिबात अवघड नाही, वेळखाऊ आणि खर्चिकही नाही. या तीन पदार्थांच्या पाककृतीवरुन सहज लक्षात येईल.

Image: Google

पेढे

पेढे तयार करण्यासाठी 2 कप दुधाची पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 चमचा साजूक तूप , एक तृतियांश कप साखर, 1 कप दूध, थोडे सुक्या मेव्याचे काप हे जिन्नस घ्यावं.
दुधाचे पेढे तयार करताना सर्वात आधी कढई गरम करायला ठेवावी. त्यात तूप घालावं. तूप गरम झालं की त्यात दूध घालावं. गरम दुधात दूध पावडर घालून ती गुठळी राहाणार नाही यासाठी चांगली ढवळावी. मिश्रण खव्याप्रमाणे घट्ट होईपर्यंत ढवळावं. ते घट्ट झालं की गॅस बंद करावा. नंतर त्यात साखर आणि वेलची घालावी. हे मिश्रण चांगलं एकजीव करावं आणि थंड होवू द्यावं. ते थंड झालं की त्याचे पेढे करावेत. बदामाचे पातळ काप पेढ्यावर लावावेत.

Image: Google

गुलाबजाम

गुलाबजाम तयार करण्यासाठी 1 कप दूध पावडर, 3 चमचे मैदा, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर, दोन चमचे साजूक तूप हे जिन्नस घ्यावं.
गुलाबजाम तयार करण्यासाठी आधी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवावी. तूप तापलं की त्यात दूध घालावं. गरम दुधात दूध पावडर घालून त्यात गुठळ्या राहू नये म्हणून ते चांगलं ढवळावं. मिश्रण घट्ट होऊ लागलं की गॅस बंद करावा. नंतर त्यात मैदा आणि वेलची पावडर घालावी. पुन्हा मिश्रण चांगलं एकजीव करुन ते चोपडं करुन घ्यावं. हे मिश्रण किमान 15 मिनिटं चांगलं रगडून मळावं. नंतर त्याचे छोटे गोळे करावेत तळण्यासाठी तूप घ्यावं . तूप तापलं की गॅसची आच मंद करावी. मंद आचेवर गोळे गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यावेत. हे सुरु असतानाच एका बाजूला एका भांड्यात पाणी आणी साखर घालून चिकट पाक करुन घ्यावा. पाक कोमट असतानाच त्यात तळलेले गुलाबजाम सोडावेत. दोन तीन तासांनी गुलाबजाम पाक पिऊन खाण्यासाठी तयार होतात.

Image: Google

नारळाचा पाक

नारळाचा पाक तयार करण्यासाठी एक कप खोवलेलं नारळ, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध पावडर, पाव चमचा वेलची पावडर1 चमचा तूप आणि सुका मेवा घ्यावा.

नारळ पाक तयार करताना आधी एका कढईत 2 कप पाणी आणि दूध पावडर घालावी. हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. या दुधाला उकळी आणावी. उकळी आली की त्यात तूप आणि साखर घालून मिश्रण सतत ढवळत राहावं. मिश्रण दाटसर झालं की त्यात खोवलेलं खोबरं घालावं. खोबरं घातल्यानंतर थोडावेळ गॅस सुरुच ठेवून ते चांगलं हलवून घ्यावं. नंतर त्यात वेलची पावडर घालून ती मिश्रणात एकजीव करावी. नंतर एका पसरट भांड्यात हे मिश्रण काढून चमच्यानं पसरुन घ्यावं. काजू कतलीप्रमाणे त्याचे काप पाडावेत. त्यावर सुक्या मेव्याचे पातळ काप पसरावेत. मिश्रण गार झाल्यावर कापलेल्या वड्या काढून घ्याव्यात. 

Web Title: How To Make sweets from Milk Powder: Make Milk Powder Pedhe-Gulabjam! Tasteful answer to the question of what to do with milk powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.