Lokmat Sakhi >Food > Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी!

Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी!

How to make val bhaji: पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी विदर्भात वालाच्या शेंगाची भाजी (pavta bhaji) आणि खिचडी असा बेत करण्यात येतो... म्हणूनच तर ही घ्या वालाच्या शेंगांची विदर्भ स्टाईल झणकेदार रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 06:57 PM2022-01-12T18:57:32+5:302022-01-12T19:00:08+5:30

How to make val bhaji: पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी विदर्भात वालाच्या शेंगाची भाजी (pavta bhaji) आणि खिचडी असा बेत करण्यात येतो... म्हणूनच तर ही घ्या वालाच्या शेंगांची विदर्भ स्टाईल झणकेदार रेसिपी...

How to make Val bhaji or pavta bhaji recipe, vidarbh special recipe | Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी!

Makar Sankranti : वालाच्या शेंगाची भोगी स्पेशल विदर्भ स्टाईल झणकेदार चमचमीत भाजी!

Highlightsकॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हिवाळ्यात वाढणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी वालाच्या शेंगा खाण्याचा सल्ला दिला जातो. 

विदर्भातलं जेवण कसं चटपटीत आणि झणझणीत असतं... भाताचे विविध प्रकार, रस्सा भाजीचे विविध प्रकार ही विदर्भातल्या जेवणाची (Nagpuri recipe) खासियत. वांग्याची, वालाच्या शेंगांची, काळ्या रस्सा असलेली झणझणीत भाजी खायची तर ती विदर्भातल्या सुगरणीच्या हातचीच खावी, असं म्हणतात. म्हणूनच तर ही घ्या वालाच्या शेंगाच्या भाजीची खास विदर्भ स्टाईल भाजी आणि तुम्हीही या रविवारी करून टाका विदर्भ स्टाईल बेत. खिचडी, वालाच्या शेंगांची भाजी आणि सोबत भाकरी नाहीतर पोळी.

 

वालाच्या शेंगाची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
Ingredients to make val bhaji

२५० ग्रॅम वालाच्या, खोबरे-लसूण- आले पेस्ट, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, बारिक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला १ चमचा, हळद, १ चमचा धना पावडर, चवीनुसार मिरची पावडर आणि मीठ, २ चमचे शेंगदाण्याचा कुट

भोगीचा अस्सल मराठवाडी खास बेत, तीळ लावून बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि खिचडी!

कशी करायची वालाच्या शेंगाची भाजी
How to make val bhaji

- भाजी करण्यासाठी वालाच्या शेंगा सोलून पाण्यात टाकून ठेवा.
- कढई गॅसवर तापत ठेवा. चांगली तापली की त्यात २ चमचे तेल टाका.


- तेल तापलं की त्यात जिरे, मोहरी टाकून फोडणी करा.
- त्यानंतर आलं- लसूण- खाेबरं ही एकत्र केलेली पेस्ट टाका. 
- लालसर होईपर्यंत हा मसाला परतला की त्यात गरम मसाला, हळद, धने पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट टाका.
- मसाल्याला चांगलं तेल सुटलं की त्यात कोथिंबीर आणि त्यानंतर टोमॅटोच्या बारिक चिरलेल्या फोडी टाका.
- या मसाल्यात थोडे मीठ टाका. चांगली वाफ येऊ द्या.
- त्यानंतर त्यात वालाच्या शेंगा टाका आणि परतून घ्या. कढईवर २ मिनिटे झाकण ठेवा.


- दोन मिनिटानंतर झाकण काढा आणि कढईतली भाजी पुन्हा एकदा चांगली हलवून घ्या. 
- आता भाजीत शेंगदाण्याचा कुट टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या.
- आता भाजीत २ ग्लास गरम पाणी टाका. भाजीला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा.
- भाजीला उकळी आली की गॅस कमी करा आणि कढईवर झाकण ठेवा.
- भाजी शिजली की गॅस बंद करा. भाकरीसोबत अशी रस्सा भाजी विशेष चवदार लागते. 


वालाच्या शेंगा खाण्याचे फायदे 
Benefits of eating Val or Pavta sabji

- ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी वाल खाणे फायद्याचे ठरते.
- महिलांचा मासिक पाळीतला त्रास तसेच कंबरदुखी कमी करण्यासाठी वालाच्या शेंगा खाण्याचा सल्ला दिला जातो.
- वालाच्या शेंगेत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी आणि सी असते.
- कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रोटिन्स, आयर्नचा उत्तम स्त्रोत म्हणून वालाची शेंग ओळखली जाते.  
- कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हिवाळ्यात वाढणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी वालाच्या शेंगा खाण्याचा सल्ला दिला जातो. 

 

Web Title: How to make Val bhaji or pavta bhaji recipe, vidarbh special recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.