सध्या बाजारात कवठं (wood apple fruit) मोठ्या प्रमाणात विकायला आली आहेत. वर्षातले २ ते ३ महिने सोडले तर एरवी हे फळ खायला मिळत नाही. सध्या कवठाचा (kavath) हंगाम असून पुढील दोन महिने आपल्याला कवठाची चव चाखायला मिळू शकते. त्यामुळेच तर यंदाच्या हंगामात कवठाची ही झणझणीत चटणी (Wood apple chutney recipe in Marathi) करणं आणि तिचा आस्वाद घेणं या गोष्टी अजिबातच मिस करू नका. चटणीची रेसिपी अतिशय सोपी आणि खूपच झटपट होणारी आहे. शिवाय चवीला अतिशय वेगळी. त्यामुळे तोंडाला पाणी सुटेल, अशी ही रेसिपी करून बघाच...
इतर फळांप्रमाणेच कवठ हे फळ खूपच आरोग्यदायी आहे. पण ते खाणं इतर फळांएवढं सोपं नाही. बाकीची फळं कापली की लगेच खाता येतात किंवा काही फळांना तर कापण्याचीही गरज नसते. पण कवठ मात्र फोडावं लागतं, त्यात गूळ टाकावा लागतो आणि मग ते खावं लागतं. त्यामुळे बरेच जण कवठ खाणंच टाळतात. पण असं करू नका. कारण कवठ खाण्याने शरीराला खूपच फायदे होतात.
कवठ खाण्याचे फायदे
Benefits of eating wood apple or kavath
- ज्या लोकांना भूकच लागत नाही, अशांसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते.
- अपचनासंबंधी अनेक त्रासांवर कवठ गुणकारी आहे.
- कवठामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कवठ खावे.
- त्याचबरोबर कवठामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांचे उत्तम प्रमाण असते.
- कवठ फळासोबतच कवठाची पानेही आरोग्यदायी असतात. फायबर आणि व्हिटॅमिन बी कवठाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असते.
- मळमळ, उलटी, पोटदुखी, जुलाब असा त्रास होत असल्यास कवठ खाण्याचा सल्ला दिला जातो.
- कवठामध्ये बिटा कॅरेटिन चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे केस आणि त्वचा चांगली होते.
- कवठ हे थंड आणि पाचक फळ म्हणून ओळखलं जातं.
कशी करायची कवठाची चटणी?
How to make wood apple chutney?
- कवठाची चटणी करण्यासाठ आपल्याला एक मध्यम आकाराचं कवठ, अर्धी वाटी गुळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, जिरे, तेल, मोहरी, हिंग आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य लागणार आहे.
- सगळ्यात आधी तर कवठ फोडून त्यातला गर बाहेर काढून घ्या. गरातल्या ज्या शिरा असतात, त्या काढून टाका. बिया तशाच राहू द्या, त्या काढण्याची गरज नाही.
video credit- You tube
- आता मिक्सरच्या भांड्यात कवठाचा गर, गूळ, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, एक टीस्पून जिरे आणि चवीनुसार मीठ टाका आणि हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या.
- ही झाली आपली चटणी. आता एका छोट्या कढईमध्ये एक टेबलस्पून तेल टाका. तेल तापलं की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की चिमुटभर हिंग टाका. ही फोडणी वरून आपल्या कवठाच्या चटणीवर टाका.
- चटणी व्यवस्थित हलवून घ्या. मस्त आंबटगोड चवीची आणि मिरच्यांमुळे चांगलीच झणझणीत, चटकदार चटणी झाली तयार.
- ही चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास ३ ते ४ दिवस टिकते.
image credit-
https://www.youtube.com/watch?v=2RT1gUPP7Sc
swatiskitchen.tumblr.com