Join us  

चपाती पचत नाही -वजनही वाढतं? १ पांढरी गोष्ट कालवून कणीक भिजवा, चपाती बनेल फॅट कटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 10:00 AM

How Many Chapatis should I Eat for Effective Weight Loss? : चपाती खा बिनधास्त वजन वाढणारच नाही..

वजन कमी करण्याचा विचार जेव्हाही मनात येतो, तेव्हा पहिल्यांदा भात आणि चपाती बंद करण्यास प्रत्येक जण सांगत असतो (Weight loss). कारण या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असते, आणि प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असते (Chapati). कार्बोहायड्रेटची गरज भागवण्यासाठी आपण आहारात चपाती आणि भाताचा समावेश करतो.

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे ते त्यांच्या आहारातून कर्बोदके कमी करतात आणि प्रोटीन्सचे प्रमाण वाढवतात. पण वजन कमी करण्यासाठी विशेष चपाती सोडण्याची गरज नाही. आपण चपाती खाऊनही वेट लॉस करू शकता. यासाठी कणिक मळताना त्यात एक गोष्ट घाला. चपाती खाऊनही वजन वाढणार नाही(How Many Chapatis should I Eat for Effective Weight Loss?).

वेट लॉससाठी कणकेत काय मिसळावं?

- वेट लॉससाठी फक्त गव्हाची पोळी खाऊ नका. त्यात मेथी दाणे पावडर, जिरे पावडर, अळशीच्या बिया, सोया चंक्स पावडर, बेसन मिसळू शकता. याने देखील फायदा होईल. पण आपण कणकेत इसबगोल देखील मिक्स करू शकता.

डाळ शिजतानाच मीठ घालावं की नंतर? पोषण भरपूर मिळायचे तर पाहा डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

- इसबगोल हे एक असे हर्ब आहे, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. इंग्रजीत त्याचे सायलियम हस्क असे नाव आहे. पोटाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त असाल तर, इसबगोल खाल्ल्याने आराम मिळेल.

- इसबगोल खाल्याने चयापचय बुस्ट होते. ज्यामुळे फॅट लॉस वेगाने होते.

१ चमचा तुपात कालवून खा ३ गोष्टी; दृष्टी होईल तेज - डोळ्यांचे विकार राहतील दूर

- इसबगोलमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिनसह अनेक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. आणि वेट लॉससाठी मदत होते. आपण कणकेत इसबगोल घालून पोळ्या करू शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्न