Join us  

नेहमीच्या कैरीच्या लोणच्याला द्या लसणाचा खमंग तडका, चव होईल आणखी झकास- बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 9:14 AM

Garlic Pickle Recipe: कैरीचं लोणचं करून झालं असेल तर त्याच लोणच्यातलं थोडं लोणचं काढून त्याला लसुणाचा खमंग झणझणीत तडका देऊन पाहा...(how to add garlic flavour to raw mango pickle?)

ठळक मुद्देतुमच्या साध्याच कैरीच्या लोणच्याला छान चटपटीत, खमंग लसूण फ्लेवर मिळेल. 

कैरीचं लोणचं आता बऱ्याच घरांमध्ये करून झालेलं आहे. कारण लोणचं घालण्याचा हंगाम आता संपत आला. लोणचं करून झालं की सुरुवातीला आपण ते हौशीने घेऊन खातो. पण नंतर तीच ती चव नकोशी वाटते. असं झालं तर आपण लोणचं खाणंच बंद करतो आणि मग एवढ्या हौशीने केलेलं लोणचं वाया जातं. असं होऊ नये म्हणून तुम्ही घातल्याला लोणच्यातला काही भाग बाजुला काढा आणि त्याला लसणाचा छान खमंग तडका द्या (Garlic Pickle Recipe). बघा लोणच्याची चव कशी आणखी छान खुलून येते...(how to add garlic flavour to raw mango pickle?)

कैरीच्या लोणच्याला कसा द्यायला लसूण फ्लेवर?

 

साहित्य

२ वाट्या साधं लोणचं

लसूणाच्या १५ ते २० पाकळ्या

फक्त आयुर्वेदातच नाही तर ग्रीक संस्कृतीतही अंजीरला म्हणतात 'सुपरफ्रुट', बघा अंजीर खाण्याचे ५ फायदे

३ ते ४ टेबलस्पून तेल

१ टेबलस्पून आल्याची पेस्ट

कृती

 

सगळ्यात आधी तर आलं व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसून घ्या. जेणेकरून त्याच्यावरची माती निघून जाईल.

त्यानंतर लसूण, आलं मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्या.

आईचे दागिने लेकीलाही आवडतात! नीता अंबानींचे दागिने इशा घालते हौशीने, पाहा त्या दागिन्यांची झलक

आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की तिच्यामध्ये तेल टाका. 

तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आलं- लसूण पेस्ट टाका आणि ती छान खमंग लालसर होईपर्यंत, तिला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

यानंतर ही पेस्ट थंड होऊ द्या आणि नंतर तुम्ही केलेल्या लोणच्यामध्ये मिसळा. तुमच्या साध्याच कैरीच्या लोणच्याला छान चटपटीत, खमंग लसूण फ्लेवर मिळेल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीआंबा