Lokmat Sakhi >Food > अरे देवा, भातात मीठ घालायलाच विसरले! ही घ्या १ युक्ती, एका मिनिटांत अळणी भाताला येईल चव

अरे देवा, भातात मीठ घालायलाच विसरले! ही घ्या १ युक्ती, एका मिनिटांत अळणी भाताला येईल चव

How To Add Salt After Cooking Rice : भात अळणी लागत असेल तर, वरून मीठ घालू नका..भाताची चव बिघडेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2024 12:40 PM2024-02-01T12:40:34+5:302024-02-01T13:03:56+5:30

How To Add Salt After Cooking Rice : भात अळणी लागत असेल तर, वरून मीठ घालू नका..भाताची चव बिघडेल..

How To Add Salt After Cooking Rice | अरे देवा, भातात मीठ घालायलाच विसरले! ही घ्या १ युक्ती, एका मिनिटांत अळणी भाताला येईल चव

अरे देवा, भातात मीठ घालायलाच विसरले! ही घ्या १ युक्ती, एका मिनिटांत अळणी भाताला येईल चव

भाताशिवाय भारतीय थाळी (Steamed Rice) अपूर्ण आहे. ताटात भात असेल तर, पोट भरते, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. प्रत्येक भारतीय घरांमध्ये दररोज भात शिजतो. डाळ-भात, भात-भाजी, बिर्याणी, तांदुळाची खीर यासह अनेक पदार्थ तांदुळाचा वापर करून तयार केला जातो. मोठ्या प्रमाणात भाताचे सेवन केले जात असले तरी भात बनवणे कठीण आहे.

कधी भात कच्चा राहतो तर, कधी जास्त मऊ होतो (Cooking Tips and Tricks). पण सिंपल भात आपण आवडीने खातो. काही जण भात शिजत असताना त्यात मीठ घालतात, तर काही जण भातात मीठ घालत नाही. अळणी भातासह डाळ किंवा भाजी मिक्स करून खातात(How To Add Salt After Cooking Rice).

पण जर आपण भातात मीठ घालायला विसरले असाल, आणि अळणी भात खायला आपल्याला आवडत नसेल तर, अशावेळी काय करावे? असा प्रश्न निर्माण होतो. भातात मीठ घालायला विसरले असाल आणि, भात शिजून तयार असेल तर, त्यात मीठ वरून न घालता, एका टीपच्या मदतीने भातात मीठ घालून मिक्स करू शकता. यामुळे भाताची चव बिघडणार नाही.

१ कप रवा - १ कप गव्हाचे पीठ - करा झ्टपट कुरकुरीत डोसा, पोटभरीचा मस्त नाश्ता

या पद्धतीने भातात मिक्स करा मीठ

भात शिजून तयार असेल तर, वरून मीठ घालू नका. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात आपल्या चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. भात मोकळा करा, त्यात मिठाचे पाणी सर्वत्र ओतून मिक्स करा. दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तव्यावर भाताचे पातेलं ठेवा व त्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर भात थोडा वाफवून घ्या. यामुळे मीठ संपूर्ण भातात मिक्स होईल. जर आपण भातात मीठ घालायला विसरले असाल तर, ही ट्रिक आपल्याला मदत करेल.

Web Title: How To Add Salt After Cooking Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.