काही खास प्रसंग असले की आपण ग्रेव्हीच्या भाज्या तयार करतो. या ग्रेव्हीच्या भाज्यांची जर ग्रेव्ही टेस्टी असली तरच अशा भाज्या खायला आणखीनच चांगल्या लागतात. रस्सेदार किंवा ग्रेव्ही असणाऱ्या भाज्यांची ग्रेव्ही अधिक टेस्टी होण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घालतो. भाज्यांची ग्रेव्ही अधिक चविष्ट आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसावी म्हणून आपण यात थोडेसे दही घालतो. रस्सेदार किंवा ग्रेव्ही असणाऱ्या भाज्यांच्या चवीत अधिक वाढ होण्यासाठी आपण त्यात थोडेसे दही घालतो(8 smart ways to prevent yogurt curdling when adding to curries or gravies).
ग्रेव्ही असणाऱ्या भाज्यांमध्ये दही घातल्याने भाज्यांना एक वेगळ्याच प्रकारचे टेक्श्चर आणि चव येते. ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये दही घातल्याने भाज्यांची चव तर छान लागतेच, परंतु काहिवेळा हे दही फुटून सगळी भाजी खराब होते. ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये दही घातल्याने भाज्यांची चव वाढत असली तरीही दही घालताना योग्य ती काळजी घ्यावीच लागते. ग्रेव्हीच्या (How to prevent Yoghurt from Curdling in gravies) भाज्या तयार करताना त्यात दही घालताना ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणांत घातल्यास भाज्यांना अधिक चांगली टेस्ट येते. परंतु दही घालतांना ते फुटू नये म्हणून काही खास टिप्स लक्षात ठेवूयात(How to add yogurt to a curry without it splitting).
ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये दही घालताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ?
१. दही व्यवस्थित फेटून घ्यावे :- ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये दही घालताना सर्वात आधी ते दही फेटून घ्यावे. कारण व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे दही एकदम गुळगुळीत व मुलायम बनते. यामुळे ग्रेव्हीमध्ये घातल्यावर ते फुटण्याचा धोका कमी होतो. दही चांगले फेटल्यावर त्यात गुठळ्या होणार नाहीत आणि ते ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळेल जाते.
२. दह्याचे तापमान सामान्य असायला हवे :- ग्रेव्हीमध्ये दही घालण्यापूर्वी ते नेहमीच्या रुम टेम्परेचरला आणावे. फ्रिजमधील थंड दही थेट गरम ग्रेव्हीमध्ये घातल्यास तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे दही फाटू शकते. त्यामुळे दही रेफ्रिजरेटरमधून काहीवेळ अगोदर बाहेर काढा, म्हणजे त्याचे तापमान सामान्य होईल.
३. मंद आचेवर शिजवा :- ग्रेव्हीमध्ये दही घातल्यानंतर गॅस मंद आचेवरच ठेवा. जास्त मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्याने दही लवकर घट्ट किंवा दही फुटून भाजी खराब होऊ शकते. जर तुम्हाला दही भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळायचे असेल आणि फाटू न देता ग्रेव्हीला चांगली चव यावी तर ते नेहमी मंद आचेवर शिजवा. त्यामुळे ग्रेव्हीमध्ये दही चांगले मिसळते आणि भाजीची चवही वाढते.
४. दही घालण्यापूर्वी शिजवलेले साहित्य तेलात घाला :- ग्रेव्ही तयार करत असताना प्रथम कांदा, टोमॅटो आणि मसाले तेलात चांगले तळून घ्या. जेव्हा हे सगळे पदार्थ चांगले तळून होतील आणि तेल सुटू लागेल तेव्हाच या ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये दही घाला. त्यामुळे दही ग्रेव्हीमध्ये सहज मिसळते आणि दही फुटण्याचा धोकाही कमी होतो.
मसाला चहा तर नेहमीचाच ! कधी पहाडी मसाला चहा प्यायलाका ? एकदा पिऊन बघा 'असा' फक्कड चहा...
५. मैदा किंवा बेसन वापरा :- ग्रेव्हीमध्ये दही घालण्यापूर्वी त्यात थोडा मैदा किंवा बेसन मिसळून फेटून घ्यावे. मैदा आणि बेसन दह्याला स्थिरता देते, ज्यामुळे ते ग्रेव्हीत घातल्याने फुटत नाही. ग्रेव्हीत मैदा किंवा बेसन घातल्याने देखील ग्रेव्ही घट्ट होऊन त्याचा पोत सुधारतो.
६. थोडे दूध किंवा मलई घाला :- दही घालण्यापूर्वी तुम्ही ग्रेव्हीमध्ये थोडे दूध किंवा मलई घालू शकता. यामुळे दही फाटण्याचा धोका कमी होतो , कारण दूध आणि मलई ग्रेव्ही घट्ट आणि गुळगुळीत करतात. यामुळे दही ग्रेव्हीमध्ये सहज मिसळते आणि फाटत नाही.
७. हळूहळू दही घाला :- ग्रेव्हीमध्ये लगेच एकदम एकाच वेळी दही घालू नका, परंतु ग्रेव्ही ढवळत असताना हळूहळू आणि सतत थोडे थोडे दही घालत राहावे. त्यामुळे दह्याचे तापमान हळूहळू ग्रेव्हीच्या तापमानाशी जुळवून घेते आणि यामुळेच दही फाटले जात नाही. तसेच ते मिक्स करताना चमच्याने सतत ढवळत राहावे जेणेकरून दही ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळेल.
८. दही घातल्यावर ग्रेव्ही जास्त उकळू नये :- दही घातल्यानंतर ग्रेव्ही जास्त वेळ उकळल्यानेही दही फाटू शकते. म्हणून, दही घालताना, ग्रेव्ही हलकी शिजवा आणि जास्त वेळ उकळणे टाळा. यामुळे दह्याचा ताजेपणा कायम राहतो आणि ग्रेव्हीची चवही सुधारते.