Lokmat Sakhi >Food > पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

How To Avoid Lumps While Making Besan Or Pithla: पिठलं करताना त्यात बेसनाच्या गुठळ्या होत असतील, तर असं होऊ नये म्हणून पिठलं करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते पाहा... (3 tips for making perfect pithla or besan)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 01:25 PM2024-02-22T13:25:46+5:302024-02-22T13:26:53+5:30

How To Avoid Lumps While Making Besan Or Pithla: पिठलं करताना त्यात बेसनाच्या गुठळ्या होत असतील, तर असं होऊ नये म्हणून पिठलं करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते पाहा... (3 tips for making perfect pithla or besan)

How to avoid lumps while making besan or pithla, Maharashrian pithla recipe, 3 tips for making perfect pithla or besan | पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

Highlightsबऱ्याचदा पिठलं करताना नेमकं काहीतरी चुकतं आणि त्या पिठल्यात गाठी किंवा गुठळ्या होतात. त्या गाठी फोडल्या की आत कच्चं पीठ दिसतं.

पिठलं हा करायला एकदम सोपा पदार्थ. काही ठिकाणी त्याला बेसनही म्हणतात. बेसन किंवा पिठलं करायला खूप वेळही लागत नाही. अगदी १० मिनिटांत गरमागरम पिठलं तयार.. त्यामुळे घरात एखाद्या वेळी भाजी नसेल, किंवा झटपट काहीतरी करायचं असेल तर पिठलं हा एक चांगला पर्याय असतो (Maharashrian pithla recipe). शिवाय तो पोळी, भाकरी, भातासोबतही खाता येतो. पण बऱ्याचदा पिठलं करताना नेमकं काहीतरी चुकतं आणि त्या पिठल्यात गाठी किंवा गुठळ्या होतात (How to avoid lumps while making besan or pithla). त्या गाठी फोडल्या की आत कच्चं पीठ दिसतं. असं होऊ नये आणि पिठलं अगदी मऊसूत, एकसारखं व्हावं यासाठी पिठलं करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा.... (3 tips for making perfect pithla or besan)

पिठल्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होऊ नये म्हणून टिप्स

 

१. पिठल्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नसतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे बेसन पीठ आधी पाण्यात व्यवस्थित कालवलं गेलं पाहिजे. ते जमलं तर मग गुठळ्या होण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं.

लसूण महागला, त्याची टरफलंही वापरा- पावडर करा आणि स्वयंपाकात घाला, बघा स्पेशल रेसिपी 

त्यासाठी पीठ भिजवताना जे पाणी वापराल ते खूप थंड नको. पाणी थोडं कोमट करून घेतलं आणि मग ते बेसन पीठ भिजवायला वापरलं तर गुठळ्या होत नाहीत.

 

२. फोडणी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पाण्यात कालवलेलं बेसन पीठ कढईत टाकाल, तेव्हा गॅस आधी कमी करा. गॅस खूप मोठा किंवा मध्यम आचेवर ठेवून त्यात बेसन टाकलं तर नक्कीच गुठळ्या होतील. 

करिना कपूरच्या चमचमत्या अनारकलीवर १ लाखांपेक्षाही जास्त आरसे, बघा त्याची न्यारीच नजाकत...

३. पातेल्यात कालवलेलं बेसन पीठ जेव्हा कढईमध्ये टाकाल, तेव्हा ते एकदम सगळं टाकू नये. थोडं थोडं करून टाकावं. तसेच थोडं थोडं टाकल्यावर प्रत्येकवेळी हलवून घ्यावं. कढईतलं बेसन पीठ हलविण्यासाठी झाऱ्याचा वापर करावा. झाऱ्याच्या छिद्रांमधून पीठ आरपार जाऊन व्यवस्थित हलवलं जातं. त्यामुळे गाठी होत नाहीत. 
 

Web Title: How to avoid lumps while making besan or pithla, Maharashrian pithla recipe, 3 tips for making perfect pithla or besan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.