Join us  

फोडणी देताना तेल अंगावर उडू नये म्हणून फोडणीत सर्वात आधी घाला हे २ पदार्थ, हातांवर तेल उडण्याची भीतीच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2024 4:20 PM

This Secret Trick Will Stop Splattering Oil Forever : फोडणी देताना भांड्यातील गरम तेल हातांवर उडू नये म्हणून आपण दोन सोप्या ट्रिक्सचा वापर करु शकतो....

'फोडणी' हा आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. डाळ, भाजी, आमटी किंवा आणखी काही पदार्थ करायचे म्हटलं की फोडणी आवश्यक असते. फोडणीशिवाय कोणताही पदार्थ चविष्ट होऊच शकत नाही. फोडणी करायची म्हणजे यासाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो असे पदार्थ लागतात. पदार्थांना फोडणी घालणं किंवा तडका देणं हे प्रत्येक स्वयंपाक घरातलं रोजच काम. वरवर पाहायला गेलं तर हे काम अगदी साधं - सोपं वाटत परंतु फोडणी देताना अनेकजणींना फारच भीती वाटते(How to Avoid Oil Splatter when giving tadka).

फोडणी देताना आपण सगळ्यांत आधी भांड्यात तेल ओतून त्यात फोडणीचे पदार्थ घालतो. परंतु हे फोडणीचे पदार्थ तेलात घालताना काहीवेळा तेल आजूबाजूला उडते. हे तेल आजूबाजूला उडाल्यानंतर गॅस शेगडी तेलाने चिकट होते एवढेच नव्हे तर काहीवेळा ही फोडणी हातांवर उडून गरम तेलाचे कण हातांवर उडतात. हे फोडणीतले गरम तेल हातांवर उडून हाताला इजा होण्याची शक्यता असते. कित्येक गृहिणी फोडणी द्यायची म्हटलं की हातांवर उडणाऱ्या गरम तेलाचा चटका बसेल म्हणून घाबरतात. यासाठी फोडणी देताना भांड्यातील गरम तेल हातांवर उडू नये म्हणून आपण दोन सोप्या ट्रिक्सचा वापर करु शकतो(This Secret Trick Will Stop Splattering Oil Forever).

फोडणी देताना हातांवर तेल उडू नये म्हणून नेमके काय करता येईल ? 

१. फोडणी देताना तेल आपण शक्यतो गरम करुन घेतो. या गरम तेलात फोडणीचे काही पदार्थ घातल्यास गरम तेल हातांवर उडते. असे होऊ नये म्हणून फोडणी देताना सगळ्यांत आधी तेल गरम केल्यावर त्या गरम तेलात चिमूटभर मीठ घालावे. या गरम तेलात मीठ घातल्याने फोडणीचे पदार्थ तेलात घातल्यास फोडणी लगेच हातांवर उडत नाही. त्यामुळे फोडणी देताना आधी गरम तेलात चिमूटभर मीठ घालावे. 

मसाला एक भाज्या अनेक ! फक्त ३ पदार्थ वापरुन करा मल्टीपर्पज मसाला, ग्रेव्ही होईल चविष्ट... 

२. याचबरोबर फोडणी देताना आपण तेलात जिरे, मोहरी, हिंग, हळद असे अनेक पदार्थ घालतो. यातही तेलात आपण सगळ्यात आधी हळद घातल्यास फोडणी चांगली बसते. याचबरोबर पदार्थाला फोडणीची चांगली चव येते. यामुळे फोडणी देताना तेलात सर्वात आधी हळद घालावी यामुळे फोडणी चांगली होते तसेच तेलही हातांवर उडत नाही.   

साखर आणि मैदा अजिबात न वापरता करा विकतसारखा चोको लाव्हा केक, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ... 

अशाप्रकारे आपण फोडणी देताना सर्वात आधी मीठ किंवा हळद घातल्याने फोडणीचे तेल हातांवर उडत नाही.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स