Join us  

साबुदाणा वडा तेलात फट्कन फुटतो-उडतं अंगावर तेल? ५ चुका टाळा- भाजणारही नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2024 1:48 PM

Mistakes You Should Avoid While Making Sabudana Vada : How To Avoid Sabudana Vada From Bursting : Important Tips On Making CRISPY SABUDANA VADA : साबुदाणा वडा तयार करताना आपण कोणत्या चुका करतो ते पाहा...

नवरात्रीचे उपवास लवकरच सुरु होणार आहेत. उपवासा दरम्यान कोणताही पदार्थ खायचा म्हटलं की सगळ्यात आधी साबुदाणा आठवतो. उपवासाला बरेचसे पदार्थ हे साबुदाणा वापरुनच तयार केले जातात. उपवासाला साबुदाणा खाल्ला नाही असं होऊच शकत नाही. साबुदाण्याची खिचडी, वडा, थालीपीठ, चिवडा असे अनेक पदार्थ आपण उपवासाला खातो. साबुदाणा वापरुन अनेक पदार्थ तयार केले जात असले तरीही साबुदाण्याचा वडा हा अतिशय फेमस आहे. याचबरोबर घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं हा गरमागरम, कुरकुरीत साबुदाणा वडा खायला खूप आवडतो. यामुळे बहुतेक घरात उपवासाला साबुदाणा वडा नक्कीच तयार केला जातो(Mistakes You Should Avoid While Making Sabudana Vada).

साबुदाणा वडा तयार करायला अतिशय सोपा आणि झटपट होणारा उपवासाचा पदार्थ आहे. करायला सोपा जरी असला तरी हा वडा अगदी परफेक्ट तयार झाला तरच खायला मज्जा येते. काही गृहिणी साबुदाणा वडा टायर करताना तो व्यवस्थित होत नाही अशी तक्रार करतात. काहीवेळा साबुदाणा वडा आतून कच्चा राहतो तर कधी हे वडे जास्तीचे तेल पिऊन खूपच तेलकट होतात. तर कधी या वड्याच्या बाहेरचे आवरण हे कुरकुरीत न होता मऊ पडते, तर कधी साबुदाणा वडा(Important Tips On Making CRISPY SABUDANA VADA ) तळताना तेलात फुटतो अशा एक ना अनेक तक्रारी असतात. खरंतर, साबुदाणा वडा तयार करण्याची रेसिपी खूप सोपी आहे परंतु आपण काहीवेळा घाईगडबडीत छोट्याशा चुका करतो. या बारीकसारीक चुकांमुळेच आपला साबुदाणा वडा परफेक्ट तयार होत नाही. साबुदाणा वडा तयार करताना आपण कोणत्या चुका करतो ते पाहूयात(How To Avoid Sabudana Vada From Bursting).

साबुदाणा वडा परफेक्ट होण्यासाठी या चुका टाळा... 

चूक १ :- साबुदाणे पाण्यांत खूप कमी वेळासाठी भिजवणे. 

साबुदाण्याचे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी सर्वात आधी साबुदाणा पाण्यांत भिजवून मऊ करावा लागतो. साबुदाणा भिजून मऊ होण्यासाठी तो एका ठराविक वेळेसाठी पाण्यांत भिजवून ठेवावा लागतो. साबुदाण्याची खिचडी करा किंवा वडा यासाठी साबुदाणा भिजवूनच घ्यावा लागतो. जेव्हा आपण साबुदाणा वडा तयार करतो तेव्हा आधी साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे की नाही ते एकदा तपासून पाहा. साबुदाणा वडा तयार करताना साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असणे खूपच गरजेचे असते. बरेचदा आपण साबुदाणा न धुता तसाच भिजत घालतो किंवा कमी वेळासाठी पाण्यात भिजवतो यामुळे साबुदाणा वडा तयार करताना बिघडतो. साबुदाणा जर नीट भिजला गेला नाही तर तो खाताना कडक किंवा कच्चा लागू शकतो. यासाठीच साबुदाणा भिजवण्याआधी किमान दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आणि त्यानंतर किमान ४ ते ५ तास किंवा रात्रभरासाठी पाण्यांत भिजत ठेवावा.           

चूक २ :- साबुदाणा भिजवल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून न टाकता आहे तसेच ठेवणे. 

साबुदाण्याचा कोणताही पदार्थ तयार करताना तो आधी भिजत ठेवावा. साबुदाणा भिजल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी आपण काढत नाही. जर साबुदाण्यात असे जास्तीचे पाणी राहिले तर साबुदाणा अधिकच चिकट होतो. अशा साबुदाण्याची वापर करून जर साबुदाणा वडा तयार केला तर तो आतून व्यवस्थित शिजत नाही आणि साबुदाण्याचा गचका होतो. साबुदाणामध्ये जास्त ओलावा असल्यास वडे तळताना तुटतात किंवा खूप मऊ आणि गुळगुळीत होतात. एवढेच नव्हे तर साबुदाणा भिजवताना जास्त पाणी वापरणे टाळावे. त्यामुळे साबुदाणा खूप ओला आणि चिकट होतो, त्यामुळे वडे बनवायला त्रास होतो आणि ते तळताना फुटून शकतात. 

नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...

चूक ३ :- साबुदाणा वड्याचे तयार मिश्रण नीट मॅश न करता तसेच त्याचे वडे तयार करणे. 

साबुदाणा वडा तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कुट, लिंबाचा रस आणि इतर पदार्थांचा वापर केला जातो. हे सगळे जिन्नस एकत्रित करून मॅश केले जातात. पण काहीजण हे सगळे पदार्थ एकत्रित करुन नीट मॅश करत नाही. साबुदाणा वड्याचे हे मिश्रण व्यवस्थित मॅश केले नाही तर यातील उकडलेल्या बटाट्याचे तिकडे तसेच्या तसेच अख्खे राहतात. यामुळे साबुदाणा वड्याला योग्य टेक्श्चर व आकार देता येत नाही. असा साबुदाणा वडा तेलात सोडला की तो फुटतो. यामुळे साबुदाणे वडे तयार कारण्याआधी त्याचे मिश्रण नीट मॅश करून घ्यावे. याउलट, हे मिश्रण अधिकच जास्त दाब देऊन मॅश करणे देखील टाळावे. यामुळे सगळ्या साबुदाण्याच्या गचका होऊन वडा पचपचीत लागू शकतो. यासाठी मिश्रण हलक्या हाताने दाब देत मॅश करुन घ्यावे. 

चूक ४ :- एकाचवेळी कढईमध्ये भरपूर वडे तळायला सोडणे. 

वेळ वाचवण्यासाठी किंवा झटपट उरकण्यासाठी अनेकवेळा काहीजणी कढईत एकाचवेळी भरपूर वडे तळायला सोडतात. तेलात एकाचवेळी एकदम भरपूर प्रमाणात वडे सोडल्याने तेलाचे तापमान कमी होते. यामुळे वडे असमान शिजतात आणि आतून ओलसर व कच्चेच राहतात. वडा नीट तळला नसल्याने त्याचे बाहेरचे आवरण पाहिजे तसे कुरकुरीत होत नाही. यासाठीच एकावेळी कढईमध्ये भरपूर वडे तळू नयेत. 

फक्त १ कप साबुदाणा आणि उकडलेला बटाटा- करा उपवासाचे नगेट्स! कुरकुरीत-चव कमाल...

चूक ५ :- साबुदाणा वड्याच्या मिश्रणात जास्त प्रमाणात शेंगदाणे घालणे. 

साबुदाणा वड्यासाठी मिश्रण तयार करताना त्यात जास्त शेंगदाणे घालू नका. २ वाट्या साबुदाण्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून मग ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. असे बारीक वाटून घेतलेले शेंगदाणेच नंतर मिश्रणात घाला. शेंगदाण्याची जाडसर भरड घालण्यासापेक्षा शेंगदाण्याचे कुट घालावे. खूप शेंगदाणे घातल्याने वडा तेलात टाकताच फुटतो, कारण शेंगदाणे वड्यासोबत तेलात गेल्यावर ते गरम होऊ लागतात आणि वडा फुटतो.    

साबुदाणा वडा तेलात फुटत असेल तर काय करावे ? 

१. तांदळाचे पीठ किंवा उकडलेले बटाटे मिक्स करावे :- जर वडे तळताना जास्तच फुटायला लागले तर त्या मिश्रणात जास्तीचे उकडलेले बटाटे किंवा थोडेसे  तांदळाचे पीठ घाला. यामुळे वडे तेलात फुटणार नाहीत आणि कुरकुरीत होतील.  

२. वडा व्यवस्थित वाळवणे :- वडा तेलात सोडण्यापूर्वी काही मिनिटे तो व्यवस्थित सुकू द्या, त्यामुळे वडा तेलात न फुटता बाहेरून कुरकुरीत होईल.

३. वडा तळल्यानंतर थंड करा :- वडा तेलातून काढल्यानंतर अतिरिक्त तेल शोषण्यासाठी पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपरवर ठेवा.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४अन्ननवरात्रीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स