Lokmat Sakhi >Food > कडक गूळ चिरण्याच्या २ झटपट ट्रिक्स, गूळ होईल किसून, हातही दुखणार नाहीत...

कडक गूळ चिरण्याच्या २ झटपट ट्रिक्स, गूळ होईल किसून, हातही दुखणार नाहीत...

Quickest way to break very hard jaggery : How to prepare jaggery powder at home आता गूळ किसताना हात दुखणार नाहीत बघा २ सोप्या ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 10:32 PM2024-06-25T22:32:38+5:302024-06-25T22:48:11+5:30

Quickest way to break very hard jaggery : How to prepare jaggery powder at home आता गूळ किसताना हात दुखणार नाहीत बघा २ सोप्या ट्रिक्स...

How to break a big block of Jaggery in less than 1 minute How to powder the whole jaggery in 10 to 15 minutes | कडक गूळ चिरण्याच्या २ झटपट ट्रिक्स, गूळ होईल किसून, हातही दुखणार नाहीत...

कडक गूळ चिरण्याच्या २ झटपट ट्रिक्स, गूळ होईल किसून, हातही दुखणार नाहीत...

कोणताही गोड पदार्थ बनवायचा म्हटलं की त्यात आपण साखर किंवा गूळ वापरतो. गोड पदार्थाची चव आणखीन चांगली लागावी यासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर केला जातो. याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने साखरेपेक्षा गूळ खाणे हे केव्हाव्ही फायदेशीर असते. मोदक, पुरणपोळी, लाडू असे गोड पदार्थ बनवताना त्यात भरपूर गूळ घालावा लागतो. कोणत्याही पदार्थात गूळ घालताना तो बारीक करुन घातला तरच छान लागतो. हल्ली गुळाची पावडर बाजारांत विकत मिळत असली तरीही अजून काही घरांमध्ये गुळाची ढेपच आणली जाते. गुळाची ढेप आपण आणतो खरं, पण ती फोडताना खूप त्रास होतो. हा गूळ वापरण्यासाठी आधी कापावा (How to Cut Jaggery Block in an Easy Way) लागतो. परंतु हा गूळ खूपच कडक असलयाने तो सहजासहजी सुरीने कापला जात नाही. अशी ही कडक गुळाची ढेप चिरणे म्हणजे अत्यंत कठीण काम असते. गुळाची ढेप चिरुन बारीक करण्यासाठी खूप वेळ लागतो व हे अनेकींना कंटाळवाणे काम वाटते(How to break a jaggery block easily).

पदार्थ बनवताना गूळ बारीक हवा असेल तर अनेक पद्धतींनी तो बारीक (How to cut a big block of jaggery and store it) केला जातो. शक्यतो गूळ बारीक करण्यासाठी आपण आधी या गुळाच्या ढेपेला फोडतो. गुळाची ढेप फोडून तिचे आधी लहान लहान तुकडे करतो. हे लहान गुळाचे खडे मग किसणीवर किसून बारीक केले जातात. परंतु अशा पद्धतीने गूळ बारीक करताना किसणीवर किसून हात दुखतो. अशावेळी आपण या दोन सोप्या ट्रिक्सचा वापर करून कमी कष्ट घेऊन झटपट गूळ बारीक करु शकतॊ(How to break a big block of Jaggery in less than 1 minute).

गूळ बारीक करण्याच्या २ सोप्या ट्रिक्स कोणत्या ? 

१. गूळ बारीक किसून घेण्यासाठी आपण गुळाची ढेप किसणीवर घासून - घासून बारीक करून घेतो. परंतु यात गूळ हातात धरुन किसताना हात दुखतो. अशावेळी किसणीवर गूळ किसण्यापेक्षा, या गुळाच्या ढेपेवर किसणी घासावी. यामुळे आपला हात दुखणार नाही तसेच गूळही झटपट किसून बारीक करता येईल. 

आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...

२. दुसऱ्या ट्रिकमध्ये, एका डिशमध्ये बटर पेपर ठेवून त्यावर गुळाची ढेप ठेवावी. त्यानंतर तो गूळ ४० ते ५० सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्या. नंतर जेव्हा तुम्ही तो गूळ बाहेर काढाल तेव्हा तो एकदम मऊ झालेला असेल. हा गूळ मऊ असतानाच पटापट कापून घ्या व डब्यांत स्टोअर करून ठेवून द्या.

रताळ्याचे कुरकुरीत खमंग काप खाऊन तर पाहा, साधा वरणभात आणि रताळ्याचे काप- पावसाळ्यात मस्त बेत..

Web Title: How to break a big block of Jaggery in less than 1 minute How to powder the whole jaggery in 10 to 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.