Lokmat Sakhi >Food > कांदे विकत घेताना कसे ओळखायचे की कांदे उत्तम प्रतीचे आहेत की खराब आहेत? तपासा..

कांदे विकत घेताना कसे ओळखायचे की कांदे उत्तम प्रतीचे आहेत की खराब आहेत? तपासा..

How To Buy & Store Onions : Simple Tips & Tricks : एकदम जास्त कांदे खरेदी करताना हे कसे तपासून पहायचे की वरवर चांगला दिसणारा कांदा चांगला आहे की लवकर सडेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 04:30 PM2023-03-02T16:30:51+5:302023-03-02T16:46:54+5:30

How To Buy & Store Onions : Simple Tips & Tricks : एकदम जास्त कांदे खरेदी करताना हे कसे तपासून पहायचे की वरवर चांगला दिसणारा कांदा चांगला आहे की लवकर सडेल?

How To Buy & Store Onions : Simple Tips & Tricks | कांदे विकत घेताना कसे ओळखायचे की कांदे उत्तम प्रतीचे आहेत की खराब आहेत? तपासा..

कांदे विकत घेताना कसे ओळखायचे की कांदे उत्तम प्रतीचे आहेत की खराब आहेत? तपासा..

कांदा हा आपल्या रोजच्या जेवणांत लागणारा महत्वपूर्ण पदार्थ आहे. भाजी, आमटी, कोशिंबीर सगळ्यांत कांद्याचा वापर केल्याशिवाय पदार्थ बनवून तयार होऊ शकत नाही. कांदा सोलण्यास कितीही कष्ट पडले किंवा डोळ्यांत पाणी आले तरीही आपण कांदा वापरायचे काही विसरत नाही. आपल्यापैकी काहीजणांना जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून कच्चा कांदा खायची सवय असते. कांदा फक्त आपल्या जेवणाला चव देण्याचेच काम करत नाही तर आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास देखील मदत करतो. याचबरोबर विविध शारीरिक आजारांवर उपचार करण्यासाठी देखील कांदा आपणास उपयोगी पडत असतो.

लाल कांद्यासोबतच आपण आपल्या रोजच्या वापरात पांढरा कांदादेखील वापरतो. कांद्याच्या सीझनमध्ये किंवा काहीवेळा कांदा स्वस्त दरात मिळत असेल तर बहुतेक गृहिणी किलोंनी कांद्याची खरेदी करुन ते साठवून ठेवतात. कांदा स्वस्त मिळाला म्हणून एकदम विकत घेताना आपण कांदा तपासून घेत नाही. काहीवेळा घाईगडबडीत आपण कांदा कसा आहे हे न बघताच पिशवीत भरतो. परंतु असे केले असता काहीवेळा त्यातील काही कांदे खराब निघण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदे बाजारांतून विकत आणताना काही महत्वाच्या टीप्स लक्षात ठेवूयात(How To Buy & Store Onions : Simple Tips & Tricks). 

चांगल्या कांद्यांची निवड करताना २ गोष्टी कायम लक्षांत ठेवा... 

१. बाजारांतून कांदा विकत घेताना कांद्याच्या देठाकडचा भाग अंगठ्याच्या मदतीने दाबून बघावा. जर कांद्याचे देठ अंगठ्याने सहज दाबले जात असेल, किंवा देठाजवळचा भाग मऊ पडला असेल आणि सहज दाबला जात असेल, तर असा कांदा विकत घेऊ नका. हे कांदे कितीही स्वस्त उपलब्ध असले तरीही आतून गळके निघण्याची शक्यता जास्त असते. याउलट, कांद्याचे देठ जर फार कठीण असेल किंवा अंगठ्याने सहज दाबले जात नसेल, तर असा कांदा आतून चांगला असतो. कांद्याचे देठ सहज अंगठ्याने दाबले जाते की नाही, हे तपासून मगच योग्य त्या कांद्याची खरेदी करावी. 

२. कांद्यांची खरेदी करताना कधीही गाठ असणारा कांदा विकत घेऊ नये. ज्या कांद्याचे दोन भागात विभाजन झाले असेल असा कांदा खरेदी करणे टाळावे. 

कांदा विकत घेताना या काही गोष्टींची काळजी घ्या...

१. जो कांदा थोडासा ओलसर दिसेल किंवा हाताला थोडा ओला लागेल, असा कांदा घेऊ नका.
२. ज्या कांद्याचे वरचे टरफल एकदम कोरडे आणि हात लावताच मोकळे होणारे असेल, असा कांदा साठविण्याच्या दृष्टीने चांगला असतो.
३. कांदा घेताना जर त्यातून थोडा जरी वास येत असेल, तर तो कांदा घेऊ नका. कारण तो आतून काळा असण्याची किंवा लवकरच सडण्याची शक्यता असते. 

४. आकाराने खूप छोटे कांदे साठविण्यासाठी घेऊ नका. कारण अशा लहान कांद्यांना लगेचच कोंब फुटतो. म्हणून कांदे साठविण्यासाठी घेणार असाल तर ते मध्यम आकाराचेच घ्या. 
५.  वरच्या बाजूने काळपट गुलाबी दिसणारा कांदा आतून खराब असण्याची, काळा, सडका निघण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वरच्या बाजूने गुलाबी, फ्रेश रंग असणारेच कांदे घ्या. 

कांदा कसा साठवायचा? 
- खरेदी करून आणलेला कांदा जास्त दिवस टिकावा, असं वाटत असेल तर त्याची साठवणूक योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं. 
- कांदा नेहमी एखाद्या जाळीच्या टोपल्यास साठवून ठेवा. भांडे धुतल्यानंतर ते ठेवण्यासाठी जी प्लॅस्टिकची किंवा स्टीलची जाळी वापरली जाते, तशा पद्धतीचे जाळीदार टोपले कांदा साठवण्यासाठी वापरा.
- यामुळे कांद्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित हवा लागेल आणि ते खराब होणार नाहीत. 


- या जाळीदार टोपल्यात सगळ्यात खाली वर्तमानपत्र अंथरा आणि त्यावर कांदे ठेवा.
- कांदा खूप उन्हात किंवा खूप दमट, ओलसर भागात ठेवू नका. दमट भागात त्याला कोंब येतात तर खूप उन्हात ठेवल्यास कांदा सुकून जातो.

Web Title: How To Buy & Store Onions : Simple Tips & Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.