Lokmat Sakhi >Food > आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा..

आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा..

How To Check If Mangoes Are Sweet And Ripe? गोड व रसाळ आंबा ओळखण्यासाठी ५ टिप्स, विकत आणा परफेक्ट आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 03:12 PM2023-04-19T15:12:57+5:302023-04-19T15:13:51+5:30

How To Check If Mangoes Are Sweet And Ripe? गोड व रसाळ आंबा ओळखण्यासाठी ५ टिप्स, विकत आणा परफेक्ट आंबे

How To Check If Mangoes Are Sweet And Ripe? | आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा..

आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा..

फळांचा राजा म्हणजेच आंबा कोणाला नाही आवडत. आंब्याचे फॅन सर्वत्र पाहायला मिळतील. उन्हाळा सुरु झाला की, बाजारात विविध प्रकारचे आंबे मिळतात. आंब्यासाठी आपण उन्हाळ्याची वाट पाहत असतो. या हंगामात बाजारत येणारा आंबा चवीला उत्कृष्ट तर असतोच, शिवाय रसाळ आंबा खाण्यात देखील मज्जा येते. आंब्याचे देखील विविध प्रकार बाजारात मिळतात. कोणाला हापूस, तर कोणाला दसरा, देवगड, लंगडा, हिमसागर आंबा आवडतो.

याशिवाय सर्वसामान्यांना बदामी आंबा, तोतापुरी आंबा, केसर आंबा, नीलम आंबा इत्यादी आंब्याचे प्रकार आवडतात. पण आंबा गोड आहे की नाही, हे कसे ओळखाल. बाजारातून आंबे आणल्यानंतर ते गोड नसले की कोणीच खात नाही. त्यामुळे वेळीच बाजारातून खरेदी करताना आंबे गोड आहेत की नाही, या ट्रिकच्या मदतीने चेक करा. रसाळ गोड चवीचे आंबे या ट्रिकने ओळखून खरेदी करा(How To Check If Mangoes Are Sweet And Ripe?).

गोड आंबा कसा ओळखावा

स्पर्शाने ओळखा

आंबा गोड आहे की आंबट स्पर्शाने ओळखून चेक करा. आंब्याला स्पर्श करताना थोडा मऊ असेल तर, याचा अर्थ असा की तो गोड असेल. पण आतून कठिण दिसत असेल तर तो आंबा आंबट असेल.

द्राक्षाचे लोणचे खाऊन तर पाहा, आंबट गोड झटपट लोणचे खाऊन तोंडाला येईल चव

स्मेल करून चेक करा

आंबा गोड आहे की आंबट हे चेक करायचं असेल तर, आंब्याच्या देठाचा सुगंध घ्या. देठाला सुगंध येत असेल तर, समजा आंबा पिकला आहे. कच्च्या आंब्याला सुगंध येत नाही. इतकंच नाही तर, केमिकल रसायनयुक्त पिकलेल्या आंब्याला देखील सुगंध येत नाही.

गोलाकार तपासा

जे आंबे किंचित गोलाकार असतात, आणि जास्त वाकलेले नसतात, ते आंबे गोड असतात. पण, जर आंबे सुडौल आणि खूप सुंदर दिसत असतील तर, ते फार पिकलेले किंवा गोड नसतील.

डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

रेषा ओळखून खरेदी करा

ज्या आंब्यावर अनेक रेषा दिसतात, ते आंबे खरेदी करू नका. असे आंबे चवीला चांगले नसतात आणि त्यात गोडवाही नसतो.

खड्डे पडलेले आंबे घेऊ नका

जर आंबे एकमेकांच्या वजनामुळे चिरडले गेले असतील, आणि मऊ पडले असतील, तर ते आंबे खरेदी करू नका. हे आंबे लगेच खराब होतात. 

Web Title: How To Check If Mangoes Are Sweet And Ripe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.