Join us  

विकत आणलेल्या खव्यात भेसळ तर नाही? ७ टिप्स, ओळखा खव्यातली भेसळ- टाळा आजारपणाचा धोका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 4:26 PM

some ways to test if khoya or mawa is adulterated : How to check mawa or khoya adulteration in 7 ways : How To Check Purity Of Mawa At Home : गोडाचे पदार्थ करायचे म्हटल्यावर आपण खवा बाहेरुन विकत आणतो पण त्यात भेसळ असेल तर..

सध्या सणावाराचे दिवस सुरु आहेत. सणवार म्हटलं की गोडधोड पदार्थ आपसूकच आले. सण कोणताही असो तो गोड पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. प्रत्येक सणाला आपल्या सगळ्यांच्याच घरी अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. या गोड पदार्थात काही जिन्नस हे आवर्जून वापरलेच जातात. या पदार्थात साखर, तूप, खवा असे अनेक पदार्थ असतात. गोड पदार्थ चांगले मिळून येण्यासाठी आणि त्याची चव छान लागावी म्हणून त्यात खवा घातला जातो. गोड पदार्थांसाठी लागणारा खवा हा शक्यतो आपण बाजारांतून विकतच आणतो(some ways to test if khoya or mawa is adulterated).

बाजारांतून विकत आणलेला हा खवा प्रत्येकवेळी चांगला फ्रेश असेलच असे नाही. काहीवेळा तर या खव्यात भेसळ देखील केली जाते. असा भेसळयुक्त खवा खाल्ल्याने आपले पोट बिघडू शकते. खवा तयार करताना शक्यतो त्यात मैदा, दुधाची पावडर, शिंगाड्याचे पीठ असे अनेक पदार्थ घालूंन बनावट किंवा भेसळयुक्त खवा (How to check mawa or khoya adulteration in 7 ways) तयार केला जातो. यामुळेच बाजारांतून खवा विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. बाजारांतून खवा विकत घेताना तो भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स समजून घेऊयात(How To Check Purity Of Mawa At Home).

खवा भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी... 

१. खव्याचा छोटासा तुकडा हातात घेऊन तो अंगठ्याने दाबून, चोळून पहावा. जर खवा हातावर चोळल्यानंतर तुपाचा वास येत असेल आणि बराच वेळ हा वास बोटांवर तसाच टिकून राहत असेल तर समजून जा की हा खवा शुद्ध आहे. 

२. खव्याचा एक लहान गोळा तयार करा आणि दोन्ही हातांच्यामध्ये हा गोळा गोलाकार पद्धतीने फिरवा. जर फिरवत असताना हा गोळा फुटत असेल तर कदाचित हा खवा भेसळयुक्त असू शकतो. 

हिरवीगार चटणी लवकर काळी पडते? ३ टिप्स, चटणीचा रंग आणि चव बदलणे शक्यच नाही...

पराठ्यात कितीही स्टफिंग दाबून भरले तरीही पराठा फाटणार नाहीच, ही घ्या स्टफिंग भरण्याची भन्नाट ट्रिक...

३. ५ मिली लिटर गरम पाण्यांत ३ ग्रॅम खवा घाला. थोड्यावेळानंतर त्यात आयोडीन सोल्युशन घाला. त्यानंतर जर या खव्याचा रंग निळा पडत असेल तर हा खवा भेसळयुक्त आहे. 

४. थोडासा खवा खाऊन त्याच्या चवीवरुन देखील आपण खवा भेसळयुक्त आहे की नाही ते अगदी सहजपणे ओळखू शकतो. खवा खाल्ल्यानंतर जर तो तोंडात चिकट चिकट लागत असेल तर समजून जा की हा खवा भेसळयुक्त आहे. शुद्ध आणि चांगला खवा खाल्ल्यानंतर कच्च्या दूधप्रमाणे त्याचा वास येतो.  

हॉटेलसारखे हिरवेगार पालकपनीर घरी करायचे? २ सोप्या टिप्स - करा चमचमीत भाजी झटपट...

५. पाण्यांत खवा घातल्यानंतर जर त्याचे लहान लहान तुकडे झाले तर असा मावा खराब असू शकतो. दोन दिवसांपेक्षा जास्त जुना खवा खरेदी करणे टाळा. असा अशुद्ध खवा खाल्ल्याने आपले आरोग्य बिघडू शकते. 

६. जर खवा शुद्ध असेल तर तो फक्त २४ तासच चांगला राहतो आणि अशुद्ध किंवा भेसळयुक्त खवा ६ ते ७ दिवस खराब होत नाही.

७. शुद्ध आणि भेसळ न केलेल्या खव्याला दुधाचा हलकासा सुगंध येतो, परंतु बनावट आणि भेसळयुक्त खव्याला कोणताही वास किंवा सुगंध येत नाही.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स