Lokmat Sakhi >Food > भरीताचं वांगं आतून किडलेलं आहे हे कसं ओळखायचं? वांग्याची खरेदी करताना लक्षात ठेवा १ खास ट्रिक

भरीताचं वांगं आतून किडलेलं आहे हे कसं ओळखायचं? वांग्याची खरेदी करताना लक्षात ठेवा १ खास ट्रिक

How To Choose Brinjal or Baingan Perfectly: भरीत करण्यासाठी आपण जे वांगे घेतो, ते किडलेले तर नाही ना हे वांगं न कापताही ओळखता येतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2024 05:51 PM2024-03-08T17:51:10+5:302024-03-08T17:51:55+5:30

How To Choose Brinjal or Baingan Perfectly: भरीत करण्यासाठी आपण जे वांगे घेतो, ते किडलेले तर नाही ना हे वांगं न कापताही ओळखता येतं.

How to Choose & Buy Brinjal, How to choose brinjal or baingan perfectly for making bharit or bharta | भरीताचं वांगं आतून किडलेलं आहे हे कसं ओळखायचं? वांग्याची खरेदी करताना लक्षात ठेवा १ खास ट्रिक

भरीताचं वांगं आतून किडलेलं आहे हे कसं ओळखायचं? वांग्याची खरेदी करताना लक्षात ठेवा १ खास ट्रिक

Highlightsभरीत किंवा भाजी करण्यासाठी अगदी परफेक्ट वांगं मिळावं यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा.

बऱ्याचदा असं होतं की भरीत करण्यासाठी आपण मोठ्या हौशेने वांगं आणतो. बाहेरून तर त्या वांग्याचा रंग एवढा आकर्षक दिसतो की तो पाहूनच आपण ते कधी एकदा घेतो आणि कधी एकदा त्याचं भरीत करून खातो, हा प्रश्न पडतो. पण जेव्हा आपण ते वांगं भाजतो आणि नंतर फोडतो, तेव्हा बऱ्याचदा ते आतून किडकं असल्याचं लक्षात येतं (How to Choose & Buy Brinjal). किंवा मग त्या वांग्यात खूपच जास्त बिया असल्याचं दिसतं. असं होऊ नये आणि आपल्याला भरीत किंवा भाजी करण्यासाठी अगदी परफेक्ट वांगं मिळावं यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा. (How to choose brinjal or baingan perfectly for making bharit or bharta)

 

वांगं खरेदी करण्यासाठी १ खास ट्रिक

मास्टरशेफ पंकज भादोरिया यांनी याविषयीची एक सोपी ट्रिक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. वांगं खरेदी करण्यासाठी गेलेल्या प्रत्येकासाठीच ती उपयोगी ठरणारी आहे. 

Women's Day: मिशेल ओबामा सांगतात- Life Is A Practice, त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी सांगते.... 

यामध्ये त्या सांगतात की जेव्हा तुम्ही भरीत करण्यासाठी वांगं विकत घ्यायला जाल तेव्हा ते वांगं हातात उचलून पाहा. जर वांगं जड लागलं तर ते घेऊ नका.

कारण जे वांगं जड आहे, ते वांगं जास्त शिळं असतं. अशा वांग्यामध्ये बिया जास्त असतात. जास्त बिया असलेलं वांगं चवीने जरा कडवट असतं. त्यामुळे त्याच्यापासून तयार झालेलं भरीत किंवा भाजी चवदार लागत नाही.

 

शिवाय अशा जड आणि शिळ्या झालेल्या वांग्यामध्ये अळ्या असून शकतात. त्यामुळे जड वांगं घेणं टाळावं.

अक्षयकुमारची 'ही' चांगली सवय आपल्याला लागली तर तब्येतीच्या अर्ध्या तक्रारी जातील- वाचा नेमकं काय...

जे वांगं थोडं हलकं असतं, ते वांगं ताजं असतं. त्यामुळे आकाराने लहान असलं तरी नेहमी हलकं वांगं घेण्यास प्राधान्य द्यावं. 

वांगं घेताना ते नेहमी सगळीकडून बारकाईने तपासून घ्यावं. वांग्याला लहानसं जरी छिद्र दिसलं तरी असं वांगं घेणं टाळावं. कारण ते वांगं किडकं असतं. 

 

Web Title: How to Choose & Buy Brinjal, How to choose brinjal or baingan perfectly for making bharit or bharta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.