पहिला पाऊस बऱ्याच भागांत आता पडलेला आहे. त्यामुळे बाजारात सध्या लोणच्याच्या कैऱ्या आलेल्या आहेत. काही जणींचं तर लोणचं घालूनही झालं आहे. बऱ्याच जणींचा असा अनुभव असतो की त्या लोणचं घालताना खूप काळजी घेतात, सगळी स्वच्छता पाळतात. पण तरीही त्यांचं लोणचं काही दिवसांतच खराब होऊ लागतं. लोणच्याला काही महिन्यांत लगेच बुरशी आलेली दिसते. कैरी निवडताना तर आपण बरोबर कडक कैरी निवडली होती, तरी लोणचं का टिकलं नाही, असा प्रश्न पडतो (simple tips and tricks for long lasting raw mango achar). तुमचंही असंच होत असेल तर लोणच्यासाठी कैरी निवडताना थोडी अधिक काळजी घ्या (tips for aam ka achar in marathi) आणि कैरीच्या कडक, करकरीतपणासोबतच इतरही काही गोष्टी तपासून घ्या. (how to choose perfect kairi or raw mango for pickle)
लोणच्यासाठी कैरी निवडताना काय काळजी घ्यावी?
१. लोणच्यासाठी कैरी निवडताना ती कडक, टणक अगदी करकरीत असली पाहिजे हे अगदी खरं. पण त्याचबरोबर तिचा रंगदेखील पाहून घ्या. कैरीचा रंग गडद किंवा काळपट हिरवा असावा. पोपटी रंगाच्या पिवळट हिरव्या रंगाच्या कैऱ्या कडक असल्या तरी घेणं टाळा.
२. लोणचं कधी घालता यालाही खूप महत्त्व आहे. पहिल्या पावसाच्या आधी लोणचं घालू नये तसंच ३- ४ पाऊस पडून गेल्यानंतरही लोणचं घालणं टाळावं. कारण या दोन्ही परिस्थितीत जे हवामान असतं ते लोणच्यासाठी पोषक नसतं.
३. ज्या कैरीवर रेषा दिसतात ती कैरी लोणच्यासाठी घेऊ नका. तसेच शेपा किंवा शेपू प्रकारातली कैरीही लोणचं घालण्यासाठी टाळावी. लाडवा ही कैरी लोणच्यासाठी उत्तम मानली जाते.
तांदळाचं पाणी प्या, वाढलेलं वजन झरझर उतरेल.. बघा कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं
४. लोणच्यासाठी कैरी निवडताना ती जाड सालीची निवडा. पातळ सालीच्या कैरीचं लाेणचं लवकर मऊ पडतं तसेच ते खराब होण्याची शक्यताही जास्त असते.