Lokmat Sakhi >Food > कोबीचा मोठा गड्डा फ्रीजमध्ये खराब होवू नये म्हणून १ सोपी ट्रिक, चिरून अर्धा उरला कोबी वाया जाणार नाही..

कोबीचा मोठा गड्डा फ्रीजमध्ये खराब होवू नये म्हणून १ सोपी ट्रिक, चिरून अर्धा उरला कोबी वाया जाणार नाही..

How To Chop Cabbage Easy Hack: 1 Easy Trick : कोबी संपूर्ण न चिरता आपल्याला हवा तितकाच कोबी घेऊन उरलेला कोबी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्याची सोपी ट्रिक समजून घेऊयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 01:02 PM2023-01-24T13:02:14+5:302023-01-24T13:02:50+5:30

How To Chop Cabbage Easy Hack: 1 Easy Trick : कोबी संपूर्ण न चिरता आपल्याला हवा तितकाच कोबी घेऊन उरलेला कोबी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्याची सोपी ट्रिक समजून घेऊयात.

How To Chop Cabbage Easy Hack: 1 Easy Trick - chop the remaining half of the cabbage and it will not go to waste. | कोबीचा मोठा गड्डा फ्रीजमध्ये खराब होवू नये म्हणून १ सोपी ट्रिक, चिरून अर्धा उरला कोबी वाया जाणार नाही..

कोबीचा मोठा गड्डा फ्रीजमध्ये खराब होवू नये म्हणून १ सोपी ट्रिक, चिरून अर्धा उरला कोबी वाया जाणार नाही..

आपण आठवड्याभराच्या भाज्या बाजारातून एकदाच विकत आणतो. मग या भाज्या आपण स्वच्छ धुवून व्यवस्थित डब्यात स्टोअर करून फ्रिजमध्ये ठेवतो. सुट्टीच्या दिवशी आपण आठवडाभराच्या लागणाऱ्या भाज्या कापून किंवा निवडून ठेवतो. यामुळे भाज्या बनवताना त्या कापताना किंवा चिरताना घाई होत नाही. परंतु काही भाज्या अशा असतात ज्या कापून ठेवल्यास कालांतराने खराब होतात. कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या कापून ठेवल्यास खराब होतात. बाजारातून कोबी आणल्यानंतर तो मोठा कोबी आपण एकाच वेळी इतक्या प्रमाणात खाऊ शकत नाही. अशावेळी अर्धा कोबी चिरून फ्रिजमध्ये ठेवल्यास तो अर्धा कोबी फ्रिजमध्ये ठेवून सुकून जातो किंवा त्याचा रंग बदलून काळा पडतो. असा खराब झालेला कोबी आपण परत खाऊ शकत नाही. अशा परिस्थिती कोबी एका सोप्या ट्रिकने चिरून घेतला तर तो काळा पडून वाया जात नाही. कोबी संपूर्ण न चिरता आपल्याला हवा तितकाच कोबी घेऊन उरलेला कोबी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्याची सोपी ट्रिक काय आहे ते समजून घेऊयात(How To Chop Cabbage Easy Hack: 1 Easy Trick).

कोबी कापण्याची सोपी ट्रिक काय आहे ? 

बाजारांतून विकत आणलेला कोबी आपण एकाच वेळी भाजी करून खात नाही. अशावेळी आपण हा कोबी चिरून अर्धा कोबी फ्रिजमध्ये ठेवतो. हा फ्रिजमध्ये ठेवलेला अर्धा कोबी काही दिवसांनी सुकून काळा पडतो. असा काळा पडलेला कोबी जर आपण परत वापरला तर त्याची चव हवी तशी येत नाही. म्हणून कोबी चिरण्याची एक सोपी ट्रिक समजून घेऊयात. 

कोबी संपूर्ण न चिरता आपल्याला हवा तितकाच कोबी घेऊन उरलेला कोबी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्याची सोपी ट्रिक saritaskitchenofficial या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. 

कृती :- 

१. बाजारांतून विकत आणलेला मोठा कोबी सर्वप्रथम साध्या पाण्याचे किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 
२. धुवून घेतलेल्या कोबीची बाहेरची पान एक - एक करून काढून घ्यावीत. 
३. कोबी सुरीने मधोमध चिरून घेण्याऐवजी बाहेरच्या बाजूने त्याची एक एक पान काढून घ्यावीत. 
४. ही काढून घेतलेली पान एकत्रित करून आपल्याला ज्या आकारात बारीक, पातळ, जाड जशी हवी तशी चिरून घ्यावीत. 
५. उरलेला कोबी आपण तसाच्या तसाच फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. 

ही सोपी ट्रिक फॉलो केल्याने आपल्याला संपूर्ण कोबी एकाच वेळी चिरण्याची गरज भासणार नाही. तसेच उरलेला कोबी आपण बिनदिक्कतपणे फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तसेच पुढच्या वेळी जेव्हा कधी आपल्याला कोबीचा वापर करायचा असेल तेव्हा आपल्याला फ्रिजमध्ये सुकून काळा पडलेला कोबी वापरण्याऐवजी फ्रेश कोबी मिळेल.

Web Title: How To Chop Cabbage Easy Hack: 1 Easy Trick - chop the remaining half of the cabbage and it will not go to waste.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.