भाजी, वरण किंवा अन्य पदार्थांत जेव्हा कांदा फोडणी (chopping onion) घालायचा असतो, तेव्हा तो थोडा जाडसर चिरला तरी चालतो. पण जेव्हा पावभाजी, मिसळ, वेगवेगळ्या उसळी, फरसाण या पदार्थांवर आपण जेव्हा कांदा घालतो, तेव्हा तो अगदी बारीक चिरलेला पाहिजे असतो. जाडसर चिरलेला कांदा या पदार्थांवर मुळीच शोभत नाही. म्हणूनच आता चॉपर किंवा फूड प्रोसेसर यापैकी काहीही नसेल तर साध्या चाकूनेही अगदी बारीक आणि दाणेदार कांदा कसा चिरायचा, याचा एक सोपा उपाय..(simple method of chopping onion quickly)
कांदा चिरण्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या foodie_z29 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
केसांना मजबूत करणारे ५ घटक, हे पदार्थ आहारात नसतील तर केस गळणारच, म्हणूनच आहारात घ्या......
धारदार चाकू वापरून आपण त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जर कांदा चिरून पाहिला, तर खरोखरंच तो अतिशय बारीक कापला जाईल शिवाय अतिशय जलद कांदा चिरून होईल. आता आपली कांदे चिरण्याची नेहमीची पद्धत थोडी वेगळी आहे, त्यामुळे या पद्धतीने भराभर कांदे कापणं सुरुवातीला थोडं जड जाऊ शकतं. पण एकदा सराव झाला की ही पद्धत अगदी सोपी वाटेल.
या व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार सगळ्यात आधी कांद्याचे मधोमध कापून दोन भाग करून घ्या. यानंतर एक भाग उभा ठेवा. कांद्याची साले जेव्हा आपण काढतो, तेव्हा कांद्यावर उभ्या आकाराच्या काही रेषा दिसतात.
कोवळ्या मुगाच्या शेंगांची झणझणीत आमटी! नेहमीच्या भाज्या- वरणाचा कंटाळा आला, करून बघा चवदार रेसिपी
त्या एकमेकींच्या अगदी जवळ असतात. बस या उभ्या रेषांवरूनच एकेक करून चाकू फिरवा आणि कांद्याच्या वरच्या देठापासून ते खालच्या देठापर्यंत त्याला छेद द्या. अशाच पद्धतीने कांद्याचे उभे छेद केल्यानंतर आता आडवे काप द्यायला सुरुवात करा. यावेळीही दोन छेदांमध्ये जास्त अंतर ठेवू नका. जसेजसे आडवे काप देत जाल, तसतसा बारीक चिरलेला कांदा मोकळा होत जाईल. एकदा प्रयत्न म्हणून अशा पद्धतीने कांदा चिरून बघायला हरकत नाही.