Lokmat Sakhi >Food > कांदा चिरायला बराच वेळ जातो; तळतानाही करपतो? फॉलो करा १ ट्रिक; स्वयंपाक होईल झटपट

कांदा चिरायला बराच वेळ जातो; तळतानाही करपतो? फॉलो करा १ ट्रिक; स्वयंपाक होईल झटपट

How to Chop Onions Quickly and Safely : शेफप्रमाणे कांदा झटपट चिरा आणि तळा; आठवडाभर फ्राईड कांदा स्टोअर करण्यासाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 03:06 PM2024-09-20T15:06:32+5:302024-09-20T15:07:38+5:30

How to Chop Onions Quickly and Safely : शेफप्रमाणे कांदा झटपट चिरा आणि तळा; आठवडाभर फ्राईड कांदा स्टोअर करण्यासाठी..

How to Chop Onions Quickly and Safely | कांदा चिरायला बराच वेळ जातो; तळतानाही करपतो? फॉलो करा १ ट्रिक; स्वयंपाक होईल झटपट

कांदा चिरायला बराच वेळ जातो; तळतानाही करपतो? फॉलो करा १ ट्रिक; स्वयंपाक होईल झटपट

जेवण चविष्ट करण्यासाठी कांद्याचा वापर आपण करतो (Cooking Tips). पदार्थात कांदा घातल्याने जेवण रुचकर लागते. काही लोक कांदा कच्चा खातात किंवा तळून नाहीतर फोडणीला वापरतात (Kitchen Tips). पण काहींना कांदा सोलणे आणि चिरणे आवडत नाही.

काही वेळेस कांद्याचे साल निघत नाही. कांद्याचे साल काढणं हे काम किचकट वाटतं. कांदा चिरण्यापासून ते तळण्यापर्यंत जर वेळखाऊ काम वाटत असेल तर, शेफ कुणाल यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे स्वयंपाक झटपट तयार होईल(How to Chop Onions Quickly and Safely).

अशा प्रकारे कांदा सोलून घ्या

कांदा सोलताना काही लोक त्याचा जास्त भाग काढतात. कांदा वाया घालवू नये म्हणून वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंनी स्टेम चिरा. यानंतर कांद्याचा पातळ भाग काढून टाका. कांद्याची मुळे काढण्यासाठी चाकूचे टोक स्थिर ठेवून चिरा. यामुळे कांद्याचा जास्त भाग कापला जाणार नाही.

डोक्यात सतत नकारत्मक विचारांचं काहूर? ५ गोष्टी करा; जगण्याला येईल आनंदी स्पीड

अशा प्रकारे कांद्याचे तुकडे


शेफ कुणाल सांगतात कांदा चिरताना प्रथम त्याचे दोन भाग करा. जर आपल्याला लांब आकाराचे कांदे हवे असतील तर, बटाट्याचे चिप्स तयार करणाऱ्या कटरने कांद्याचे स्लाईज करून घ्या. न चिरताही कांद्याचे लांब काप तयार होतील. कांद्याचे तुकडे जितके पातळ असतील तितके चांगले फ्राय होतील.

कांदे या पद्धतीने परतवून घ्या

चिरलेला कांदा तळण्यासाठी आपल्याला फ्रेश आणि जास्त तेल लागेल. यामुळे कांदे छान फ्राय होतील, आणि जास्त तेलही पिणार नाहीत. शेफ कुणाल कपूर यांच्या मते, कांदा नेहमी मिडियम फ्लेमवर फ्राय करा. हाय फ्लेमवर कांदा फ्राय केल्याने जास्त करपू शकते. याशिवाय कांदा नेहमी तपकिरी होईपर्यंतच फ्राय करा.

कांद्याचा कुरकुरीत डोसा खाऊन तर पाहा! १० मिनिटात इन्स्टंट रेसिपी; नाश्ता टेस्टी

फ्राईड कांदे कसे स्टोअर करून ठेवायचे?

कांदा तळून झाल्यानंतर ताटात फ्राईड कांदे काढून घ्या. पेपर किंवा टिश्यूवर फ्राईड कांदे पसरवा. फ्राईड कांदा थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवा. आपण हा फ्राईड कांदा आठवडाभर वापरू शकता. 

Web Title: How to Chop Onions Quickly and Safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.