Lokmat Sakhi >Food > कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं? ५ उपाय, कांदा रडवणार नाही, बारीक चिरला जाईल

कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं? ५ उपाय, कांदा रडवणार नाही, बारीक चिरला जाईल

How to Chop Onions Without Tears, 5 Solutions कांदा चिरण्याची यूनिक टेक्निक, कांदा चिरला जाईल पटपट, डोळ्यातून एक थेंबही अश्रू पडणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 02:33 PM2023-05-28T14:33:28+5:302023-05-28T14:34:15+5:30

How to Chop Onions Without Tears, 5 Solutions कांदा चिरण्याची यूनिक टेक्निक, कांदा चिरला जाईल पटपट, डोळ्यातून एक थेंबही अश्रू पडणार नाही..

How to Chop Onions Without Tears, 5 Solutions | कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं? ५ उपाय, कांदा रडवणार नाही, बारीक चिरला जाईल

कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं? ५ उपाय, कांदा रडवणार नाही, बारीक चिरला जाईल

कांदा चिरताना बऱ्याचदा डोळ्यातून पाणी येतं. कांदा खायला जितका रुचकर लागतो तितकाच चिरताना रडवतो. पण कांदा रडवत नसून, एन्झाईम्समुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं. कांद्याच्या पेशींमध्ये असणार्‍या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक, चुरचुरणारे ठरतात.

या रसायनात एका रेणूत ६ कार्बन, १२ हायड्रोजन आणि २ गंधकाचे अणू असतात. अमिनो अॅसिड, सल्फोक्सिड अॅसिड आणि अनजाईम अॅसिड याच्यापासून सल्फोनिक अॅसिड तयार होते. हे अॅसिड हवेत पसरतात. जे डोळ्यांतील अश्रूंमध्ये संयोग पावतात, त्यामुळे डोळ्यातून पाणी येते. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये, यासाठी काही टिप्स फॉलो करा. हे टिप्स आपल्याला नक्की मदत करतील(How to Chop Onions Without Tears, 5 Solutions).

कांदा मुळाच्या दिशेने चिरा

कांदा वरच्या बाजूने चिरला तर, त्यातील एन्झाईम्स डोळ्यांवर जास्त परिणाम करतात. ज्यामुळे डोळ्यांना जळजळ होते. म्हणूनच कांदे नेहमी मुळापासून म्हणजेच खालच्या बाजूने चिरायला हवे. कांदे मुळापासून चिरल्याने एन्झाईम्सचा प्रभाव कमी होतो.

कैरीची आंबटगोड शेव कधी खाल्ली आहे? सिझन संपण्यापूर्वी करा कुरकुरीत ‘कैरी शेव!’

लिंबू करेल मदत

कांदा चिरताना डोळ्यांवर जळजळ होऊ नये म्हणून लिंबाची मदत घ्या. कांदा चिरण्यापूर्वी चाकुवर लिंबाचा रस लावा. ज्यामुळे कांदा चिरताना एन्झाईमचा डोळ्यांवर परिणाम होणार नाही. व कांदा चिरताना डोळ्यांमधून पाणी येणार नाही.

व्हिनेगरचा वापर करा

कांदा चिरताना डोळ्यातून अश्रू येऊ नये म्हणून व्हिनेगरचा वापर करा. यासाठी कांदा चिरण्यापूर्वी व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा. यामुळे कांदा चिरताना डोळ्यांना जळजळ होणार नाही.

पालक चिरून नाहीतर अख्ख्या पानांची करा कुरकुरीत भजी, कमी तेल पिणारी भजी, खवय्यांना नक्की आवडेल..

कांदा फ्रीजरमध्ये ठेवा

कांदा चिरण्यापूर्वी त्याची साल सोलून काही वेळ फ्रीझरमध्ये ठेवा. यामुळे कांद्यामध्ये असलेल्या एन्झाईम्सचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे कांद्या चिरताना डोळ्यांमध्ये जळजळ होणार नाही.

दिवा किंवा मेणबत्ती लावा

कांदा चिरताना जवळ दिवा किंवा मेणबत्ती लावून ठेवा. यामुळे कांद्यामधून बाहेर पडणारे एन्झाइम उष्णतेकडे वळतील. व  याचा प्रभाव डोळ्यांवर होणार नाही. ज्यामुळे कांदा चिरताना डोळ्यांमधून पाणी येणार नाही.

Web Title: How to Chop Onions Without Tears, 5 Solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.