पदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत आवर्जून कडीपत्ता वापरतो. कडीपत्ता हा मसाल्याच्या पदार्थांपैकी एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. बाजारातून आपण कडीपत्ता आणतो खरा पण तो (know How to Store Curry Leaves fresh for long) फारतर एक किंवा दोन दिवस चांगला राहतो, नंतर लगेचच वाळून जातो. कडीपत्ता (How To Store Curry leaves for 2 to 3 month) एकदा वाळला की त्याचा स्वाद तर कमी होतोच पण फोडणीत घातला तरी त्याची विशेष चव लागत नाही. मग असा कडीपत्ता आपण शक्यतो फेकूनच देतो. पण हिरवागार कडीपत्ता असेल तर तो पदार्थात (Kitchen Tip to Store Curry Leaves for Long Time) घालायलाही छान वाटतो. काही वेळा तर फ्रिजमध्ये नीट ठेवूनही हा कडीपत्ता काळा पडतो. एकदा कडीपत्त्याची पानं वाळली किंवा तो काळा पडला की तो फेकूनच द्यावा लागतो(How to clean and store Curry Leaves Fresh for Longer).
कडीपत्ता बरेच दिवस ताजा राहण्यासाठी आणि स्वयंपाकात वापरता यावा यासाठी तो साठवण्याची १ सोपी ट्रिक पाहूयात. ज्यामुळे हा कडीपत्ता चांगला २ ते ३ महिने आहे तसाच छान हिरवागार राहू शकतो. यामुळे कडीपत्ता आणि पैसे दोन्हीही वाया जाणार नाही. पाहूयात कडीपत्ता साठवण्याची सोपी ट्रिक...
कडीपत्ता स्टोअर करण्याची एक भन्नाट ट्रिक...
कडीपत्ता किमान २ ते ३ महिने स्टोअर करुन ठेवण्याची एक सोपी आयडिया पाहूयात. यासाठी आपल्याला एका मोठ्या बर्फाच्या ट्रे ची गरज लागणार आहे.
१. सर्वात आधी कडीपत्ता देठापासून काढून वेगळा करून घ्या. कडीपत्त्याची सगळी पाने काढून घ्यावीत.
२. आता एका मोठ्या बर्फाच्या ट्रे मध्ये ही सगळी पण थोडी थोडी करून प्रत्येक खणात हाताने हलकेच दाब देत बसवून घ्यावी.
पोहे - खोबऱ्याची मऊसूत इडली! हलकी - फुलकी इडली खाण्याचा घ्या आनंद, ही घ्या झटपट रेसिपी...
३. त्यानंतर या ट्रे मध्ये पाणी भरून ट्रे नेहमीप्रमाणे फ्रिजरमध्ये स्टोअर करुन ठेवून द्यावा. यामुळे बर्फ गोठून कडीपत्त्याचा क्यूब तयार होतो.
४. जेव्हा आपल्याला कडीपत्ता फोडणीसाठी लागेल त्याच्या १० मिनिटे आधी हवे तेवढे क्युब्स बाहेर काढून पाण्याने भरलेला ग्लासात टाकावेत. यामुळे बर्फ वितळून तुम्हाला कडीपत्त्याची फ्रेश आणि ताजी पाने फोडणीसाठी मिळतील. मग आपण या कडीपत्त्याचा वापर करु शकता.
अशाप्रकारे आपण कडीपत्ता बर्फाच्या ट्रे मध्ये स्टोअर करून पुढचे किमान २ ते ३ महिने खराब न होता स्वयंपाक करताना वापरु शकता.