Join us  

कडू मेथी कशी ओळखावी? कोथिंबीर जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे? पाहा निवडण्याची सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 12:18 PM

How to clean and store Green leafy vegetables : मेथी-कोथिंबीर निवडणं वेळखाऊ-किचकट काम वाटतं? पालेभाज्या खरेदीपासून ते निवडण्यापर्यंत, पाहा कंटाळवाणे काम होईल सोपं

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या (Green Vegetables) स्वस्त दरात आणि फ्रेश मिळतात. संपूर्ण बाजारपेठ हे हिरव्या पालेभाज्यांनी बहरते. या दिवसात बरेच जण मेथी, पालक आणि कोथिंबीरचे विविध पदार्थ तयार करून खातात. भाजी, भजी, वडी, पराठे यासह अनेक पदार्थ पालेभाज्यांचा वापर करून तयार केले जातात. पण पालेभाज्या निवडण्यात बराच वेळ जातो. शिवाय हे काम कंटाळवाणे देखील वाटते.

पालकाची पानं मोठी असतात, ती चटकन निवडली जातात. पण मेथी आणि कोथिंबीरीची पानं लहान असतात. ज्यामुळे यात बराच वेळ जातो. जर आपल्याला कमी वेळात भाज्या निवडायच्या असतील, शिवाय मेथी-कोथिंबीरीची (Fenugreek-Coriander Leaves) जुडी खरेदी करताना कोणत्या खास टिप्स लक्षात ठेवाव्या. पाहूयात(How to clean and store Green leafy vegetables).

कोथिंबीर निवडताना लक्षात ठेवा खास ३ टिप्स

- कोथिंबीर विकत घेताना बारीक पानांची खरेदी करा. शिवाय कोथिंबीरीच्या जुडीच्या आत जास्त माती किंवा चिखल आहे की नाही हे तपासून खरेदी करा. प्रत्येक जुडीमध्ये माती असते, पण जास्त माती असेल तर, कोथिंबीर निवडताना आपला जास्त वेळ जाऊ शकतो.

- काही महिला कोथिंबीर निवडताना खालची देठ सरसकट चिरून पानं घेतात, पण ही पद्धत चुकीची आहे. कोथिंबीर निवडताना पानं घ्यावी जास्त देठ घेऊ नये.

- काही वेळेला कोथिंबीर स्टोर करून ठेवल्यास अधिक काळ टिकत नाही. ती लवकर खराब होते. अशा वेळी फक्त डब्यात स्टोर करून ठेऊ नका. ओलाव्यामुळे कोथिंबीरीचा चिखल होऊ शकतो. शिवाय कोथिंबीरीची पानं लवकर पिवळी किंवा काळपट पडू शकतात. असे होऊ नये म्हणून डब्यात एक सुती कापड ठेवा, त्यात निवडलेली कोथिंबीर ठेवा.

कोवळ्या-हिरव्यागार मेथीचे करा खमंग ‘मेथी मुटके!’ मुलांच्या डब्यासाठी खुसखुशीत पौष्टिक पदार्थ, झटपट रेसिपी

मेथी निवडण्यासाठी सोप्या ४ टिप्स

- मेथी खरेदी करताना बरेच जण मोठ्या पानांची जुडी खरेदी करतात. मोठ्या पानांच्या मेथीला मेथ्या असे म्हणतात. पण मोठ्या पानांची मेथी चवीला कडू लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नेहमी लहान पानांची मेथीची जुडी खरेदी करा.

- मेथी खरेदी करताना आतून व जुडी संपूर्ण बाजूने निरखून पाहा. कारण बऱ्याच मेथीच्या जुडीमध्ये मेथी कमी, आणि पालापाचोळा जास्त असतो. शिवाय काही मेथीच्या जुडीमध्ये माती देखील जास्त असते. त्यामुळे मेथी खरेदी करताना लहान पानांची खरेदी करा.

महाराष्ट्रीयन कढीला द्या ढाबास्टाईल तडका, पाहा बुंदी कढी करण्याची सोपी कृती, मारा फुरका- थंडीत जेवा दोन घास जास्त

- मेथी निवडताना आधी पसरवून घ्या. नंतर कोवळ्या देठापर्यंत निवडा. मेथीची शेवटची पानं शक्यतो घेऊ नका, ही पानं चवीला कडू लागतात. नेहमी मेथीची पुढची कोवळी पानं निवडून घ्यावीत. यामुळे मेथी झटपट निवडून होईल, शिवाय वेळही वाचेल.

- मेथी निवडून झाल्यानंतर एका डब्यात सुती कापड घालून त्यात निवडलेली मेथी ठेवा. असे केल्याने मेथीच्या पानांमधील ओलसरपणा निघून जाईल. शिवाय आठवडाभरही टिकेल.

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न