भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भाज्यांमध्ये पालेभाज्या व्यतिरिक्त आपण अनेक भाज्यांचा आहारात समावेश करतो. त्यात फ्लॉवरचा देखील समावेश आहे. लोकं फ्लॉवर आवडीने खातात. मात्र, फ्लॉवर लवकर साफ होत नाही. पावसामुळे फ्लॉवरमध्ये अनेक किडे लपतात. ते साफ करताना अगदी बारकाईने लक्ष द्यावे लागते.
जर फ्लॉवर व्यवस्थित साफ झाला नाही तर, आपल्याला पोटाचे विकार होऊ शकते. फ्लॉवर व्यवस्थितरित्या साफ करायचा असेल तर, ५ सोप्या स्टेप्स फॉलो करून पाहा. या स्टेप्समुळे काही मिनिटात, जास्त मेहनत घेता, फ्लॉवर लवकर साफ होईल(How to Clean Cauliflower in 5 Steps).
स्टेप - १
फ्लॉवर साफ करताना आधी त्याचे लहान तुकडे करा. यामुळे फ्लॉवरचा कुजलेला भाग लवकर ओळखता येईल. व त्यात लपलेले लहान किडे लवकर दिसून येतील.
गणेशोत्सव स्पेशल : बाप्पाला मोदक तर आवडतातच, पण यंदा करुन पाहा मोदकाची झणझणीत आमटी!
स्टेप - २
फ्लॉवरचे बारीक तुकडे केल्यानंतर वाहत्या पाण्यात धुवून काढा. जर फ्लॉवरच्या आत किडे दडलेले असतील तर, ते सहज वाहत्या पाण्यासोबत निघून जातील, व फ्लॉवर लवकर स्वच्छ होईल.
स्टेप - ३
फ्लॉवर मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. मिठाच्या पाण्यामुळे फ्लॉवरमध्ये दडलेले लहान - मोठे किडे बाहेर पडतील. त्यामुळे यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही.
उरलेले तेल फेकू नका, करा ४ स्मार्ट उपयोग - महागडे तेल वाया न जाता होतील कामे
स्टेप - ४
फ्लॉवरमधील किडे काढण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करू शकता. उकळत्या पाण्यात फ्लॉवर शिजत घातल्याने, त्यातील लहान - मोठे किडे नष्ट होतील. उकळत्या पाण्यात काही मिनिटे फ्लॉवर शिजवल्यानंतर त्याची आपण भाजी किंवा इतर पदार्थ करू शकता.
स्टेप - ५
जर आपल्याला कुरकुरीत फ्लॉवर तयार करायचा असेल तर, गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करा. थंड पाण्यामुळे देखील फ्लॉवरमधील किडे निघून जातील.