Lokmat Sakhi >Food > विकत आणलेल्या मशरूमवर काळे डाग? पाहा मशरूम धुण्याची सोपी ट्रिक, राहतील ताजे आणि स्वच्छ...

विकत आणलेल्या मशरूमवर काळे डाग? पाहा मशरूम धुण्याची सोपी ट्रिक, राहतील ताजे आणि स्वच्छ...

The Fast & Easy Way to Clean Mushrooms : How to Clean Mushrooms the Right Way : the quickest way to clean mushrooms : How to Clean Mushrooms Before Cooking : मशरुम्स वरील काळा थर कसा काढावा हा प्रश्न पडत असेल तर यासाठी ही खास ट्रिक वापरुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 18:59 IST2025-02-01T18:48:41+5:302025-02-01T18:59:47+5:30

The Fast & Easy Way to Clean Mushrooms : How to Clean Mushrooms the Right Way : the quickest way to clean mushrooms : How to Clean Mushrooms Before Cooking : मशरुम्स वरील काळा थर कसा काढावा हा प्रश्न पडत असेल तर यासाठी ही खास ट्रिक वापरुन पाहा...

How to Clean Mushrooms Before Cooking The Fast & Easy Way to Clean Mushrooms How to Clean Mushrooms the Right Way the quickest way to clean mushrooms | विकत आणलेल्या मशरूमवर काळे डाग? पाहा मशरूम धुण्याची सोपी ट्रिक, राहतील ताजे आणि स्वच्छ...

विकत आणलेल्या मशरूमवर काळे डाग? पाहा मशरूम धुण्याची सोपी ट्रिक, राहतील ताजे आणि स्वच्छ...

थंडीच्या सिजनमध्ये बाजारात सगळ्याच प्रकारच्या भाज्या व फळे खूप चांगली मिळतात. आपण बाजारात खरेदी करत असताना एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक केलेले छत्रीच्या आकाराचे मशरूम (The Fast & Easy Way to Clean Mushrooms) हल्ली जास्त पाहायला मिळतात. या मशरूम्सना सध्या बाजारात खूप मोठी मागणी आहे. हेल्थ कॉन्शियस व्यक्ती आपल्या डाएट मध्ये या मशरुम्सचा आवर्जून वापर करतात(the quickest way to clean mushrooms).

मशरूम ही ठराविक सिजनमध्ये येणारी भाजी (How to Clean Mushrooms the Right Way) असल्यामुळे आपण हौसेने ती खरेदी तर करतो. परंतु कधी कधी  हे मशरूम्स फ्रिजमध्ये ठेवून त्यावर एक काळ्या रंगाचा थर जमा होतो. तसेच आपल्यापैकी काही गृहिणी ही भाजी पहिल्यांदा करत असतील तर हे मशरुम्स कोणत्या पद्धतीने स्वच्छ करावेत, याची माहिती नसते. जर तुम्हालासुद्धा या मशरुम्स वरील काळा थर कसा काढावा हा प्रश्न पडत असेल तर यासाठी काही खास टीप्स समजून घेऊयात(How to Clean Mushrooms Before Cooking).

मशरुम असे करा स्वच्छ... 

१. बाजारांतून विकत आणलेल्या मशरुमवर काहीवेळा हलकासा असा काळा थर असतो. असा काळा थर स्वच्छ करण्यासाठी आपण मीठ व गव्हाच्या पिठाचा वापर करु शकतो.  
२. सगळ्यात आधी बाजारांतून विकत आणलेले मशरूमस एका मोठ्या चाळणीत काढून नळाच्या वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यावेत. 
३. त्यानंतर एका डिशमध्ये गरजेनुसार मीठ आणि गव्हाचे पीठ एकत्रित करुन घ्यावे. किंवा आपण थेट या मशरुमस वर भुरभुरवून घातले तरीही चालेल. त्यानंतर मीठ आणि गव्हाच्या पीठ या मशरूमसवर हलकेच चोळून घ्यावेत. 
४. आता मशरूमस नळाच्या वाहत्या पाण्याखाली पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावेत.   

या उपायामुळे मशरूमवरील काळा थर अगदी सहज निघून जाऊन मशरुम स्वच्छ होतात. याचबरोबर मशरुम स्वच्छ केल्याने जास्त दिवस फ्रिजमध्ये टिकतात. 

दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...


फक्त २ तासांत लावा विकतसारखे दही, विरजण लावताना मिसळा ‘हा’ सिक्रेट पदार्थ...

इतरही उपाय लक्षात ठेवा... 

१. हळद आणि मीठाचा वापर - एका बाऊलमध्ये चिमूटभर हळद आणि मीठ घालून त्या मिश्रणात हे मशरुम्स काही काळासाठी ठेवून द्या. थोड्यावेळाने, या मशरुम्सना स्वच्छ पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. 

२. मैदा - जर तुमचे मशरुम्स काळे पडले असतील तर त्यावर थोडा मैदा भुरभुरून घ्या. तसेच बोटांच्या मदतीने या मशरुम्सना हलकेच स्क्रब करून घ्या मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अश्याप्रकारे मैद्याच्या साहाय्याने तुम्ही मशरुम्सवरील काळा थर काढू शकता.  

३. रवा - रव्याच्या मदतीने तुम्ही मशरुम्स स्वच्छ करू शकता. एक चमचा रवा घेऊन त्यात मशरुम्स घोळवून घ्या. मग बोटांनी हलकेच रगडून घ्या. रव्याच्या दाणेदार टेक्शचरमुळे त्यावरील काळा थर लगेच निघून जाईल.

हे पण नक्की लक्षात ठेवा... 

१. ज्या दिवशी तुम्ही बाजारातून मशरुम्स खरेदी करून आणाल. शक्यतो त्याच दिवशी ते वापरा. जर तुम्हाला त्याच दिवशी ते वापरायचे नसल्यास त्याचे प्लॅस्टिक पॅकिंग उघडू नका. 

२. जर तुम्ही अनवधानाने हे पॅकिंग उघडले असेल तर हे मशरुम्स स्वच्छ धुवून मग संपूर्ण वाळवून घ्या. त्यानंतर हवाबंद डब्यात किंवा पिशवीत भरून रेफ्रिजरेट करा. यामुळे तुमचे मशरुम्स खराब न होता जास्त काळ टिकून राहतील.

Web Title: How to Clean Mushrooms Before Cooking The Fast & Easy Way to Clean Mushrooms How to Clean Mushrooms the Right Way the quickest way to clean mushrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.