स्वयंपाकासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरणं काही नवीन नाही. भारतात तेलाशिवाय कोणताही स्वंयपाक पूर्ण होत नाही. खासकरून सण-उत्सवांच्यां दिवशी पुरी, पापड असे पदार्थ तेलात तळले जातात. असे पदार्थ करायला भरपूर तेलाची आवश्यकता असते. वारंवार या तेलाचा वापर करण्याची आवश्यकता असते. एकदा वापरून झाल्यानंतर या तेलाचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. वापरलेलं तेल साफ करण्यासाठी काही सोपे उपाय करून पाहायला हवेत. ज्यामुळे तेल स्वच्छ होण्यास मदत होते. (How To Clean Oil For Reuse)
१) गाळणीचा वापर
सगळ्यात आधी तुम्ही तळण्यासाठी वापरलेलं तेल थंड होऊ द्या. त्यानंतर हे तेल गाळणीनं गाळून घ्या. या तेलातील मोठे तुकडे सहज निघून जातील असं केल्यानं तेलाचा पुन्हा वापर करता येईल. याचे कण स्मोकिंग लेव्हल वाढवतात आणि जे तब्येतीसाठी चांगले नसते.
२) कॉर्न स्टार्च मिसळा
तेल आणि कॉर्न स्टार्चचे मिश्रण मंद आचेवर गरम करा. हे तेल उकळणार नाही याची काळजी घ्या नंतर एका चमच्याच्या मदतीनं ढवळत राहा. १० मिनिटांत कॉर्न स्टार्च तेलात गव्हाच्या गोळ्याप्रमाणे तयार होईल नंतर याचे तेल वेगळे करा. तेल गाळणीनं व्यवस्थित गाळून घ्या. याशिवाय तेल गरम करून लिंबू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून त्यावर घाला. असं केल्यानं लिंबाला काळे कण चिकटतील आणि तेल थंड झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा.
तेल साठवताना या गोष्टींची काळजी घ्या
तेल काचेच्या किंवा स्टिलच्या भांड्यामध्ये भरून कोणत्याही थंड आणि स्वच्छ जागेवर ठेवा. तुम्ही हे तेल फ्रिजमध्येसुद्धा स्टोअर करू शकता.