Join us  

डाळीत किडे झाले? ३ सोप्या ट्रिक्स, डाळ निवडून स्वच्छ होईल एकदम झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 4:23 PM

Easy 3 Tricks for Cleaning Pulses : न निवडता डाळीमधून खडे काढायचेत? मग या ३ ट्रिक्स नक्की फॉलो करून पाहा.

ठळक मुद्देजर आपल्याला डाळी निवडण्याची सोपी ट्रिक हवी असेल तर, या ३ ट्रिक्स नक्की फॉलो करून पाहा. या काही ट्रिक्समुळे काही मिनिटात डोळ्यांना त्रास न होता डाळी झटपट निवडून होतील.

भारतीय थाळी डाळीशिवाय अपूर्ण आहे. भारतीय पदार्थांमध्ये आपल्याला डाळ(Pulses) ही सापडेलच. डाळी अनेक प्रकारच्या असतात. विविध डाळींमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र, अनेक डाळींमध्ये बरेच दगड, टरफल, आणि इतर लहान-सहान गोष्टी आढळतात. एखाद्या घासामध्ये लहान जरी खडा लागला तरी, आपली जेवणाची इच्छा कमी होते. त्यामुळे महिलावर्ग बारीक डोळ्यांनी डाळी निवडतात.

काही डाळी साफ असतात, काही डाळींमध्ये अनेक खडे आणि किडे सापडतात. त्यामुळे डाळी नीट निवडूनच वापरावे लागतात. जर आपल्याला डाळी निवडण्याची सोपी ट्रिक हवी असेल तर, या ३ ट्रिक्स नक्की फॉलो करून पाहा. या काही ट्रिक्समुळे काही मिनिटात डोळ्यांना त्रास न होता डाळी झटपट निवडून होतील(How to clean pulses, Easy 3 Tricks for Cleaning Pulses).

गरम पाण्याने करा डाळी साफ

डाळी साफ करण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करू शकता. या ट्रिकमुळे डाळी झटपट स्वच्छ होतील. यासाठी एका मोठ्या भांड्यात गरजेनुसार डाळ घ्या, त्यात त्याहून जास्त गरम पाणी घाला. गरम पाण्यामुळे डाळींवर लागलेली माती निघून जाईल. त्यातील लहान किडे तरंगत पाण्यावर येतील. त्यानंतर गरम पाणी काढून घ्या. त्यातील खडे ही आपल्याला स्पष्ट दिसतील. त्यामुळे थंड पाण्याऐवजी कोमट किंवा गरम पाण्याने डाळी धुवून त्याचा वापर करा.

कपभर पांढरे वाटाणे-२ बटाटे, चटपटीत रगडा करण्याची सोपी कृती, १५ मिनिटात डिश रेडी

चाळणीचा करा असा वापर

डाळीतील खडे काढण्यासाठी आपण चाळणीचा वापर करू शकता. चाळणीत डाळी घालून चाळल्याने लहान छिद्रांमधून खडे खाली पडतील. या ट्रिकमुळे न निवडता डाळी काही मिनिटात निवडून होतील.

स्टीलची प्लेट ठरेल उपयुक्त

डाळीतील खडे, दगड, घाण काढण्यासाठी आपण स्टीलच्या प्लेटचा वापर करू शकता. स्टीलच्या प्लेटवर डाळी घेऊन निवडल्याने, डाळीतील खडे, दगड किंवा इतर घाण लवकर दिसून येईल, व निवडताना डोळ्यांवर जास्त ताणही पडणार नाही.

डाळीतून किडे दूर करण्यासाठी उपाय

बटाटे लवकर शिजत नाही, कुठे अर्धे कच्चे, तर कुठे फुटतात? एक ट्रिक, ५ मिनिटात बटाटे शिजवण्याची नवी ट्रिक

- सहसा डाळी आपण डब्यात साठवून ठेवतो. अशा वेळी आपण डाळींच्या डब्यात तमालपत्र ठेऊ शकता. तमालपत्राच्या उग्र वासामुळे कीटक डाळीभोवती फिरकणार नाही.

- डाळीच्या डब्यात आपण तमालपत्राऐवजी लवंगसुद्धा ठेऊ शकता. लवंगाच्या उग्र वासामुळे डाळीच्या डब्याजवळ किडे फिरकणार नाही. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.