आपल्याकडे चिंचेचा उपयोग अगदी पूर्वीपासून स्वयंपाकात करण्यात येतो. याचा आंबटगोड स्वाद कोणत्याही पदार्थाला अधिक रूचकर करतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या, आमटी, डाळ, सांबार अशा अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात चिंच आवर्जून घातली जातात. चिंचेचा वापर आपल्या स्वयंपाकघरात दररोज केला जातो, म्हणून प्रत्येकजण आपल्या स्वयंपाकघरात चिंच स्टोअर करुन ठेवतो. पावसाळा सोडला तर इतर ऋतूंमध्ये चिंच सहज खराब होत नाही, परंतु पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील ओलाव्यामुळे चिंच लवकर खराब होतात(How to preserve tamarind such that it doesn't get infected with worms).
स्टोअर करून ठेवलेल्या चिंचेला ओलावा लागला की ती लगेच खराब होतात किंवा त्यांवर बुरशी येऊ लागते. यामुळे स्टोअर करून ठेवलेली चिंच पावसाळ्याच्या ओलाव्यामुळे खराब होऊ नये म्ह्णून आपण जुन्या पारंपरिक पद्धतीचा (How to Clean & Store Tamarind For One Year ) वापर करून चिंच स्टोअर करून ठेवू शकतो. या पद्धतीचा वापर केल्याने चिंच खराब न होता दीर्घकाळ आहेत तशीच चांगली राहतील. चिंच स्टोअर करण्याची ही पारंपरिक पद्धत नेमकी कोणती, आणि ती दीर्घकाळ टिकून राहावीत म्हणून काय काळजी घ्यावी ते पाहूयात(Storing tamarind the traditional way).
चिंच स्टोअर करण्याची पारंपरिक पद्धत...
चिंच स्टोअर करण्यापूर्वी चिंचेची सालं आणि बिया सर्व काढून चिंच साफ करून घ्यावीत. चिंच स्टोअर करताना ती शक्यतो सिरॅमिक किंवा काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करावीत, कारण या मटेरियल पासून तयार झालेल्या बरण्या ओलावा आत येण्यापासून प्रतिबंधित करतात आणि चिंच सुरक्षित राहतात. ही चिंच बरणीत स्टोअर करुन ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी जाडे मीठ पसरवून त्याचा एक थर तयार करुन घ्यावा.
हे जाडे मीठ प्रिझर्व्हेटिव्हचे काम करते आणि चिंच दीर्घकाळ चांगली टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यानंतर या मिठाच्या थरावर सालं आणि बिया काढून घेतलेली चिंच पसरवून घालावीत. त्यानंतर पुन्हा एक मिठाचा थर त्यावर पुन्हा चिंचेचा थर असे अनुक्रमे मीठ आणि चिंचेचा थर एकमेकांवर लावून घ्यावा. बरणीच्या तोंडाशी सगळ्यात वर मिठाचा थर येईल याची काळजी घ्यावी. मिठाचा वापर केल्याने चिंच दीर्घकाळ चांगली टिकवून ठेवण्यास मदत होते. जाडे मीठ विरघळून त्याचे पाणी होत नाही, तसेच हे मीठ बाहेरच्या ओलाव्याने ओले, चिकट होत नाही म्हणून चिंच स्टोअर करण्यासाठी त्यात जाड्या मिठाचा वापर करावा.
गणेशोत्सव स्पेशल : घरीच झटपट करा रसमलाई मोदक, कपभर पनीर आणि फक्त १० मिनिटांत मोदक तयार...
इतर गोष्टीही लक्षात ठेवा...
१. कोरडी आणि हवेशीर जागा निवडा :- पावसाळ्यात चिंच नेहमी कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. ओलसर ठिकाणी चिंच लवकर खराब होऊ शकतात.
२. सुकी चिंच खरेदी करा :- बाजारातून चिंच विकत घेताना ती सुकी आणि चांगली पॅक केलेली आहेत याची खात्री करूनच मग चिंच खरेदी करा. ओली आणि कच्ची चिंच लवकर खराब होऊ शकतात.
३. बरणीत कडुलिंब आणि तमालपत्र घाला :- चिंच ज्या बरणीत साठवली आहेत त्यात कंटेनरमध्ये कडुलिंब किंवा तमालपत्र घाला. ही पाने नैसर्गिकरित्या जंतुनाशक असतात आणि चिंचेचे कीटकांपासून संरक्षण करतात.
४. वेळोवेळी तपासत रहा आणि सूर्यप्रकाश दाखवा :- चिंच वेळोवेळी तपासा आणि जर चिंच खराब होत असतील तर अशी खराब चिंच लगेच बरणीतून काढून टाका, जेणेकरून उरलेली चिंच खराब होणार नाही. याशिवाय चिंचेला काही ठराविक काळानंतर सूर्यप्रकाशात बाहेर ठेवा जेणेकरून त्याला ओलावा लागणार नाही.
५. सिलिका जेल वापरा :- चिंचेच्या डब्यात सिलिका जेल किंवा इतर आर्द्रता शोषणारी पॅकेट घाला. यामुळे चिंच कोरडी ठेवण्यास मदत होईल. तुम्ही पॅकेट थेट चिंचेच्या डब्यात किंवा झाकणावर चिकटवू शकता.