Join us  

ब्रोकोली आणि फ्लॉवर धुण्याची पाहा योग्य पद्धत; अळ्या जातील निघून आणि भाजीही राहील फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 6:02 PM

Correct Method of Washing Broccoli, Cauliflower: ब्रोकोली- फ्लॉवर या भाज्या स्वच्छ करण्याची बघा एक खास पद्धत.. तुमच्या भाजीमध्ये किती घाण, अळ्या, किडे होते हे देखील लगेच दिसून येईल.

ठळक मुद्देतुमच्या भाजीमध्ये किती घाण, अळ्या, किडे होते हे देखील लगेच दिसून येईल.

ब्रोकोली किंवा फ्लॉवर ( broccoli, cauliflower) अशा भाज्या धुणे जरा कठीण जाते. फळं भाज्या आपण हाताने चोळून धुवू शकतो. पालेभाज्या पाण्यात भिजत ठेवू शकतो. पण ब्रोकोली किंवा फ्लॉवर यासारख्या भाज्यांचा एक गड्डाच असतो. त्यामुळे त्या भाज्या धुणे थोडे अवघड असते. म्हणून मग या भाज्या धुण्यासाठी आपण त्या आधी चिरतो आणि नंतर पाणी गरम करून त्यात ठेवतो. पण या पद्धतीनुसार त्या भाज्यांमधले किडे, घाण व्यवस्थित साफ होत नाही. म्हणूनच ब्रोकोली किंवा फ्लॉवर अशा भाज्या धुण्यासाठी ही आणखी एक पद्धत बघा. (How to clean vegetables like broccoli, cauliflower properly?)

 

ब्रोकोली- फ्लॉवर कशा पद्धतीने धुवावे?१. या पद्धतीनुसार वरील भाज्या धुवायच्या असतील तर आपल्याला एक मोठे भांडे भरून पाणी, १ टेबलस्पून मीठ आणि १ टेबलस्पून मैदा असे साहित्य लागणार आहे.

२. सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या. त्या पाण्यात ब्रोकोलीचा किंवा फ्लॉवरचा गड्डा उलटा करून टाका. म्हणजे त्या गड्ड्याचे देठ वर असावे.

 

३. त्यानंतर पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा मैदा टाका. ब्रोकोलीच्या किंवा फ्लॉवरच्या गड्ड्यानेच ते पाणी गोलाकार दिशेने ढवळून घ्या. त्यानंतर १५ ते १० मिनिटे भाजी त्या पाण्यात तशीच राहू द्या. त्यानंतर भाजी पाण्यातून काढून घ्या आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने खळबळून घ्या. आता अशी धुतलेली भाजी तुम्ही शिजवू शकता.

४. जर तुमच्या भाजीमध्ये किडे, अळ्या, घाण असेल तर ती मीठ आणि पीठाच्या पाण्यात तरंगताना दिसेल.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.स्वच्छता टिप्स