अनेक घरांमध्ये भाज्यांपेक्षा डाळ जास्त आवडीने खाल्ली जाते. वरण -भात खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवसच पूर्ण होत नाही. पण नेहमी नेहमी त्याच चवीचा वरण भात खाऊन कंटाळा येतो.(Best Dal Recipe) जेवणाला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. घरी बनवल्या जाणाऱ्या डाळीची चव वाढवण्यासाठी तुम्ही रेसिपीत काही सोपे बदल करू शकता. (How To Cook dal To Perfection)
वरण भात हा पदार्थ कॉमन असाल तरी प्रत्येकाच्या हातच्या वरणाची चव आणि टेक्स्चर वेगवेगळे असते. काहीजण तुरीच्या डाळीचे तर काहीजण मूग डाळ, मसूर डाळीचे वरण खातात. वरणाला फोडणी देण्याच्याही भारतात एकापेक्षा पद्धती आहेत. तुम्ही डाळ शिजवताना काही सोप्या टिप्स वापरल्या तर घरीच हॉटेलस्टाईल डाळ बनवता येईल. (How to increase Taste of Dal)
डाळ फ्राय
साधं फोडणीचं वरण आपण रोजचं खातो. दाल फ्राय बनवण्यासाठी तुम्ही फक्त डाळ न शिजवता डाळ शिजवण्याआधी त्यात कांदा, टोमॅटो, मिरच्या, हळद घालून शिजवा. डाळ घोटून झाल्यानंतर मोहोरी, जीऱ्याबरोबर फोडणी देताना त्यात कढीपत्ता लसूण घाला. मग शेवटी डाळीला नवी चव येण्यासाठी तुम्ही लाल मिरची, जीरं, हिंग याची फोडणी घालू शकता.
राजमा डाळ
सहजा लोक मुगाच्या डाळीचे किंवा तुरीच्या डाळीचे वरण खातात. बदल म्हणून तुम्ही राजमा डाळ बनवू शकता. यातून तुम्हाला चव आणि पोषण दोन्ही मिळेल. राजमा डाळ तुम्ही भात किंवा चपाती, नान कशाहीबरोबर खाऊ शकता.
बटाटा क्रिस्पी डाळ
लहान मुलं जर डाळ खायला नाक मूरडत असतील तर बटाटे चिरून आधी ऑलिव्ह ऑईलमध्ये किंवा राईच्या तेलात तळून घ्या. नंतर त्यावर थोडा चाट मसाला घालून ही डाळ मुलांना वाढा. त्यानंतर तयार डाळीच्या भांड्यात हे बटाट्याचे काप घाला.
कमी तेलाचा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा घरीच करा; पोहे आकसू नयेत यासाठी खास टिप्स
आंबट डाळ
हिंग आणि जीऱ्याची फोडणी दिलेली डाळ तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. नेहमीची डाळ अधिक स्वादीष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात आमसूल पावडर किंवा चिचेचं पाणी, कोकमाचं पाणी घालू शकता. मारवाडी स्टाईल खट्टी डाळ बनवण्यासाठी तुम्हाला कोकम किंवा चिंचेचा पल्प उकळत्या डाळीत घालावा लागेल. जेणेकेरून चव अधिक चांगली लागेल.