Lokmat Sakhi >Food > रेस्टोरंटस्टाइल मऊ -मोकळा जीरा राईस कुकरमध्ये करा; सोपी ट्रिक, जीरा राईस होईल परफेक्ट

रेस्टोरंटस्टाइल मऊ -मोकळा जीरा राईस कुकरमध्ये करा; सोपी ट्रिक, जीरा राईस होईल परफेक्ट

How to cook jeera rice in pressure cooker : हॉटेलस्टाईल जीरा राईस घरीच बनवणं खूपच सोपं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:46 PM2023-04-25T12:46:12+5:302023-04-25T15:28:53+5:30

How to cook jeera rice in pressure cooker : हॉटेलस्टाईल जीरा राईस घरीच बनवणं खूपच सोपं आहे.

How to cook jeera rice in pressure cooker : Jeera Rice recipe Cumin Rice in Pressure Cooker | रेस्टोरंटस्टाइल मऊ -मोकळा जीरा राईस कुकरमध्ये करा; सोपी ट्रिक, जीरा राईस होईल परफेक्ट

रेस्टोरंटस्टाइल मऊ -मोकळा जीरा राईस कुकरमध्ये करा; सोपी ट्रिक, जीरा राईस होईल परफेक्ट

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात तेच तेच खाऊन कंटाला आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. वरण भात आपल्या प्रत्येकाच्या जेवणात असतोच. (Cooking Tips & Tricks) रोजच्या जेवणात डाळ भात खाऊन कंटाळा आला की पुलाव, मटार राईस, टोमॅटो राईस किंवा बिर्याणी सारखे पदार्थ बनवले जातात. (Jeera Rice recipe Cumin Rice in Pressure Cooker)

फोडणीच्या डाळीबरोबर खाण्यासाठी जीरा राईस हा उत्तम पर्याय आहे. रेस्टोरंटस्टाईल मऊ, मोकळा जीरा राईस बनवणं एकदम सोप्पं आहे. घरात बनवलेला जीरा राईस चिकट होतो. मोकळा शिजत नाही अशी अनेकींची तक्रार असते. हॉटेलस्टाईल जीरा राईस बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to cook jeera rice in pressure cooker)

साहित्य

बासमती तांदूळ -1 कप 

तूप- 1 टीस्पून

मीठ - ½ टीस्पून 

दालचिनीचा तुकडा -1 इंच

काळी मिरी - 6

लवंग- 2

जिरे  -1 टिस्पून

कोथिंबीर- 2 टीस्पून.

कृती

जीरा राईस बनणं खूपच सोपं आहे. अनेकदा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा  जीरा राईस ऑर्डर करतो. हॉटेलस्टाईल जीरा राईस घरीच बनवणं खूपच सोप्प आहे. तुम्ही घरी पाहूणे आल्यानंतरही हा पदार्थ बनवू शकता. 

-तांदूळ स्वच्छ पाण्यानं ३ ते ४ वेळा धुवून २० मिनिटांसाठी भिजवायला ठेवा. २० मिनिटांनंतर तांदळातलं अतिरिक्त पाणी काढून टाका. कुकरमध्ये तूप घालून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. 

विरजणाशिवाय घट्ट, मलईदार दही लावण्याच्या ४ ट्रिक्स; विकतसारखं परफेक्ट दही बनेल घरीच

-यात तुम्ही जीरं, लवंग, काळी मिरी, दालचिनी,डाळी भाजून घ्या.  मसाले भाजल्यानंतर त्यात तांदूळ आणि मीठ घालून मसाल्यांसह व्यवस्थित एकत्र करा. 

-आता त्यात २ कप पाणी घालून कुकरचं झाकण बंद करा. २ शिट्ट्या होईपर्यंत तांदूळ शिजवून घ्या नंतर गॅस बंद करा. कुकरचं प्रेशर संपेपर्यंत तांदूळ कुकरमध्ये राहू द्या. नंतर कुकर उघडून भात परतवून घ्या.

Web Title: How to cook jeera rice in pressure cooker : Jeera Rice recipe Cumin Rice in Pressure Cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.