पोळी भाजी आपण नेहमी खातो. ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरमध्ये पोळी भाजीशिवाय पर्याय उरत नाही (Noodles). पोळी भाजीशिवाय पोटही भरत नाही (Cooking Tips). पण रोज तेच तेच पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. अशावेळी आपण थोडं वेगळं म्हणून चायनीज खातो. चायनीजमध्ये न्युडल्स अनेकांना आवडतात (Food). न्युडल्समध्ये देखील अनेक प्रकार आहेत.
नूडल्स खाण्यासाठी आपण खास रेस्टॉरंटमध्ये जातो. कारण घरात रेस्टॉरंटस्टाईल न्युडल्स तयार होत नाही. कधी चिकट तर, काही वेळेस चव बिघडते. अनेकदा सॉसचे प्रमाणही चुकते. जर आपल्याला घरात झटपट न्युडल्स तयार करायचे असतील तर, आपण कुकरमध्येही न्युडल्स तयार करू शकता. घरगुती न्युडल्स ते ही प्रेशर कुकरमध्ये कसे करायचे? पाहूयात(How to Cook Noodles in a Pressure Cooker).
कुकरमध्ये नूडल्स कसे करायचे?
लागणारं साहित्य
नूडल्स
सोया सॉस
चिली सॉस
टोमॅटो केचअप
व्हिनेगर
मीठ
काळी मिरी
ढोबळी मिरची
गाजर
ना गुळ - ना साखर, कपभर ड्रायफ्रुट्सची करा पौष्टीक बर्फी; मिळेल ताकद-हाडंही ठणठणीत
कोबी
लसूण
पाणी
तेल
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये नूडल्स घ्या. त्यात एक ग्लास पाणी घाला. ५ मिनिटांसाठी नूडल्स त्यात भिजत ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये २ चमचे सोया सॉस, २ चमचे रेड चिली सॉस, दीड चमचा टोमॅटो केचअप, अर्धा टेबलस्पून व्हिनेगर, चवीनुसार मीठ आणि दीड चमचा काळी मिरी पूड घालून साहित्य मिक्स करा. नंतर त्यात बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला किंवा किसलेला गाजर आणि बारीक चिरलेला कोबी घालून सॉसमध्ये भाज्या मिक्स करा.
पुऱ्या - भजी तळल्यानंतर उरलेले तेल फेकून का देता? २ युक्त्या, बघा तेलाचे काय करायचे..
प्रेशर कुकरमध्ये एक चमचा टेबलस्पून तेल घाला. नंतर त्यात एक कप पाणी, एक चमचा बारीक चिरलेला लसूण, सॉसमध्ये मिक्स केलेल्या भाज्या आणि नूडल्स घालून मिक्स करा. नंतर साहित्य मिक्स करा. त्यात एक कप पाणी घालून प्रेशर कुकरचं झाकण लावा. प्रेशर कुकर गॅसवर ठेवा. २ शिट्ट्यानंतर गॅस बंद करा. प्रेशर कुकर थोडं थंड झाल्यानंतर झाकण उघडून चमच्याने पुन्हा मिक्स करा, आणि प्लेटमध्ये काढून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे प्रेशर कुकरमध्ये चमचमीत नूडल्स खाण्यासाठी रेडी.