Join us  

छोले भिजवायला विसरलात? ३ ट्रिक्स, न भिजवताही करा चमचमीत छोले-बाधण्याचीही भीती नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 3:06 PM

How to cook chole without soaking overnight : छोले भिजवायला विसरल्यास तुम्ही बेकींग सोड्याचा वापर करू शकता. बेकींग सोडा एक नैसर्गिक घटक आहे  ज्यामुळे छोले मऊ शिजतील.

गरमा गरमा छोले पुरी खायला सर्वांना आवडते.  काबुली चण्यांची भाजी बनवण्याआधी ते ८ ते १० तास आधी भिजवावे लागतात.   रात्रभर छोले भिजवल्यानंतर सकाळी भाजी बनवली जाते. रात्रभर भिजवलेले छोले लवकर शिजताना आणि स्वयंपाकाचा वेळही वाचतो. (How to Cook Chickpeas With or Without Soaking) पण अनेकदा  घाई गडबडीत छोले भिजवायला वेळ मिळत नाही किंवा विसरायला होतं. अशावेळी परफेक्ट छोले बनवण्यासाठी काय करावं असा प्रश्न पडतो. (How to cook perfect chole without soaking overnight)

घरी पाहूणे येणार असतील तेव्हा तुम्ही छोटे भटूरे बनवण्याच्या विचारात असाल आणि रात्री छोले भिजवायला विसरलात तर टेंशन घेण्याचं काही कारण नाही. काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही परफेफ्ट छोले बनवू शकता. (How to cook perfect chole without soaking overnight)

गरम पाणी

 

तुम्ही भाजी करण्याच्या २ तास आधी छोटे भिजवत असाल तर सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी व्यवस्थित उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यात छोले घाला आणि नंतर उच्च फ्लेमवर ५ मिनिटं उकळा नंतर गॅस बंद करा. १ ते २ तासांनी तुम्ही छोले भाजी बनवण्यासाठी वापरू शकता.

बेकींग सोडा

छोले भिजवायला विसरल्यास तुम्ही बेकींग सोड्याचा वापर करू शकता. बेकींग सोडा एक नैसर्गिक घटक आहे  ज्यामुळे छोले मऊ शिजतील. सगळ्यात आधी २ वाटी छोले कुकरमध्ये घाला त्यात ४ ग्लास पाणी घाला. त्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा बेकींग सोडा घाला. नंतर कुकरचं झाकण बंद करा. ३ शिट्ट्या येईपर्यंत उच्च फ्लेमवर शिजवा नंतर आच मंद करून  अर्ध्या तासासाठी उकळा नंतर गॅस बंद करा. कुकरमधून वाफ बाहेर येईपर्यंत वाट बघा. नंतर छोले मसाल्यांसह मिसळा.

बर्फ किंवा थंड पाणी

जर तुम्ही रात्री छोले भिजवायला विसरला असाल तर सगळ्यात आधी २ वाटी छोले कुकरमध्ये  घाला आणि त्यात २ ग्लास पाणी घाला. छोले  २ शिट्ट्या येईपर्यंत उकळा नंतर गॅस बंद करा. वाफ  बाहेर आल्यानंतर झाकण उघडून पाणी वेगळं करा.

भाजलेल्या बटाट्याची करा झटपट टेस्टी भाजी; १० मिनिटांत होणारी खमंग आलू सब्जी

छोले पाण्यातून काढून पुन्हा कुकरमध्ये घाला. आणि २ ग्लास थंड पाणी घालून बर्फाचे ४ ते ५ तुकडे घाला.  नंतर कुकरचं झाकण बंद करा ५ मिनिटं उच्च आचेवर उकळू द्या. नंतर गॅस बंद करा. कमीत कमी ५ मिनिटं गॅसवर छोले शिजवल्यानंतर कुकर उघडून तपासा. छोले व्यवस्थित उकळलेले दिसतील. त्यात मसाले घालून तुम्ही टेस्टी छोले बनवू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स