Join us  

भात गचगचीत होतो, तर कधी करपतो? ३ ट्रिक्स- करा मऊ-मोकळा परफेक्ट भात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 3:08 PM

How To Cook Perfect Rice Every Time : भात गचगचीत होतो तर कधी कच्चा राहतो अशी तक्रार बऱ्याच महिलांची असते. (How To Cook Perfect Rice Every Time)

संपूर्ण भारतभरात भात आवडीनं खाल्ला जातो. संपूर्ण दिवसभरात एकदातरी लोक भात खातातच. तांदळापासून भात, पुलाव, बिर्याणी खीर असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. (How to Cook Rice Perfectly) वरण भात हा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीनं बनवला जातो. (Cooking Tips & Hacks)  भात गचगचीत होतो तर कधी कच्चा राहतो अशी तक्रार बऱ्याच महिलांची असते. (How To Cook Perfect Rice Every Time)

तांदूळ चांगला शिजावा आणि जेवणाची रंगत वाढावी यासाठी भात बनवताना काही ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर जेवणाची चव वाढण्यास मदत होईल. परफेक्ट भात बनवणं वाटतं तितकं सोपं नाही कारण भात नेहमीच डाळ किंवा इतर  गेव्ही डिशेजबरोबर सर्व्ह केला जातो. म्हणूनच भात बनवताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

१) भात बनवताना १ कप भात शिजण्यासाठी २ कप पाणी हे  प्रमाण ठेवा.  जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर भात जास्त गचगचित होऊ शकतो. जर तुम्ही कमी पाणी वापरलं तर भात अर्धवट शिजेल किंवा कुकरच्या तळाशी चिकटेल.

२) तांदूळ शिजवताना  पाण्यात एक चिमुटभर मीठ घाला. यामुळे तांदळाला चांगली चव येईल. याशिवाय तुम्ही तांदूळाची चव वाढवण्यासाठी त्यात वेलची किंवा दालचिनी घालू शकता. 

३) तांदूळ पातेल्यात शिजवत असाल तर भांडं आधीच उघडायला जाऊ नका.  पूर्ण शिजल्यानंतरच गॅस बंद करा आणि वाफ निघाल्यानंतर कुकर उघडा. भात मोकळा  राहण्यासाठी शिजल्यानंतर कुकरमधून बाहेर काढून एका ताटात किंवा खोलगट भांड्यात काढा.

४)  तुम्ही तांदूळ दुकानातून विकत घेताना जुन्या तांदळाची निवड केली तर ते चांगले शिजतील.  भात शिजल्यानंतर १० मिनिटं झाकून नंतर वाढा. यामुळे तांदळातला ओलावा कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न