Lokmat Sakhi >Food > रेस्टॉरंटस्टाईल मोकळा भात शिजवण्याची १ ट्रिक; भात अजिबात गचका होणार नाही, पाहा व्हिडिओ

रेस्टॉरंटस्टाईल मोकळा भात शिजवण्याची १ ट्रिक; भात अजिबात गचका होणार नाही, पाहा व्हिडिओ

How to Cook Perfect Rice : जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जेवायला जाता तेव्हा तिथले आचारी परफेक्ट भात शिजवण्यासाठी कोणती ट्रिक वापरत असतील असा प्रश्न पडतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 09:09 AM2023-02-01T09:09:00+5:302023-02-01T09:10:02+5:30

How to Cook Perfect Rice : जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जेवायला जाता तेव्हा तिथले आचारी परफेक्ट भात शिजवण्यासाठी कोणती ट्रिक वापरत असतील असा प्रश्न पडतो.

How to Cook Perfect Rice : How to cook white rice How to Cook Rice Without It Sticking Together | रेस्टॉरंटस्टाईल मोकळा भात शिजवण्याची १ ट्रिक; भात अजिबात गचका होणार नाही, पाहा व्हिडिओ

रेस्टॉरंटस्टाईल मोकळा भात शिजवण्याची १ ट्रिक; भात अजिबात गचका होणार नाही, पाहा व्हिडिओ

भात हा भारतीयांच्या रोजच्या खाण्यातील पदार्थ आहे. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. भात मोकळा शिजला तर खायला छान लागतो. (How to Cook Rice Without It Sticking Together) भात गचका होतो मोकळा सडसडीत  होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. स्वयंपाक बनवणं वाटतं तितकं सोपं नाही. परफेक्ट पदार्थ बनवण्याच्या बारीक सारीक टिप्स माहीत असल्या तरच जेवणाची रंगत वाढते. (Cooking Hacks & Tricks) 

बिर्याणी किंवा पुलाव बनवण्याच्या बेत असो किंवा नॉनव्हेजबरोबर भात खायचा असो भात मोकळा आणि चविष्ट असेल तर घरातलेही पोटभर जेवतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जेवायला जाता तेव्हा तिथले आचारी परफेक्ट भात शिजवण्यासाठी कोणती ट्रिक वापरत असतील असा प्रश्न पडतो. या व्हिडिओमधली ट्रिक पाहून तुम्हाला भात बनवण्याची सोपी पद्धत समजून घेता येईल. (How do you cook rice so it is fluffy)

१) दीड कप तांदूळ तीन वेळा भरपूर पाण्यात धुवा (तांदूळ जास्त  जोरात धुवू नका)

२) तांदूळ किमान २ तास पाण्यात भिजत ठेवा.

३) एका भांड्यात ३ कप पाणी गरम करा 

४) त्यात गरजेनुसार मीठ आणि १ चमचा तेल/तूप घाला

५) पाणी उकळायला लागल्यावर भिजवलेले तांदूळ गाळून घ्या आणि पाण्याची पातळी तांदळाच्या पातळीएवढी होईपर्यंत उकळा. अॅल्युमिनियम फॉइलसह सील करा.

६) एक तवा गरम करून या तव्यावर भांडे ठेवा. 12 मिनिटे उकळवा. 

७) आचेवरून काढा आणि 10 मिनिटे तसाच राहू द्या. तयार आहे परफेक्ट, मोकळा भात.

Web Title: How to Cook Perfect Rice : How to cook white rice How to Cook Rice Without It Sticking Together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.