Lokmat Sakhi >Food > कुकरमध्ये लावलेला भात शिजताना बाहेर येतो, पचपचीत होतो, वाया जातो? १ ट्रिक, भात शिजेल परफेक्ट

कुकरमध्ये लावलेला भात शिजताना बाहेर येतो, पचपचीत होतो, वाया जातो? १ ट्रिक, भात शिजेल परफेक्ट

How to Cook Rice in an Indian Style Pressure Cooker : प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवताना प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2023 02:15 PM2023-10-02T14:15:25+5:302023-10-02T14:16:14+5:30

How to Cook Rice in an Indian Style Pressure Cooker : प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवताना प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यायला हवी

How to Cook Rice in an Indian Style Pressure Cooker | कुकरमध्ये लावलेला भात शिजताना बाहेर येतो, पचपचीत होतो, वाया जातो? १ ट्रिक, भात शिजेल परफेक्ट

कुकरमध्ये लावलेला भात शिजताना बाहेर येतो, पचपचीत होतो, वाया जातो? १ ट्रिक, भात शिजेल परफेक्ट

सध्या प्रत्येक घरात प्रेशर कुकरचा वापर होतो. प्रेशर कुकरमध्ये (Pressure Cooker) जेवण लवकर शिजते. ज्यामुळे इतर वेळखाऊ कामं झटपट पूर्ण होतात. प्रेशर कुकरमध्ये साधारण आपण डाळ-भात (Rice) शिजवतो. काही लोकं त्यात भाताची खिचडीही तयार करतात. काहींकडे मोठा प्रेशर कुकर असतो. ज्यात कुकरच्या दोन भांड्यात भात आणि डाळ शिजवण्यास ठेवण्यात येते.

मात्र, अनेकदा कुकरच्या भांड्यात लावलेला भात शिजताना बाहेर येतो. ज्यामुळे कुकरभर भात किंवा डाळ पसरते. अशा वेळी अन्न तर वाया जातेच, शिवाय प्रेशर कुकरही लवकर खराब होते (Cooking Tips). नकळत घडणाऱ्या छोट्या चुकांमुळे असे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे कुकरमध्ये भात-डाळ लावताना कोणती काळजी घ्यायला हवी? पाहूयात(How to Cook Rice in an Indian Style Pressure Cooker).

कुकरच्या भांड्यात डाळ-भात लावताना कोणती काळजी घ्यायला हवी?

सर्वप्रथम, कुकरच्या एका भांड्यात तांदूळ घ्या, व दुसऱ्या भांड्यात डाळ घ्या. तांदूळ आणि डाळ भांडं भरेल इतके घेऊ नका, अर्ध्याहून कमी भरा. जेणेकरून भात आणि डाळ भांडयाबाहेर येणार नाही. त्यानंतर त्यात प्रत्येकी २ कप पाणी घालून धुवून घ्या. डाळ आणि तांदूळ धुतल्यानंतर त्यात पाणी घाला.

पालेभाज्या सुकतात-सफरचंद काळी पडतात? लिंबाच्या रसाचा एक सोपा उपाय, काही मिनिटात दिसतील फ्रेश

पण पाणी घालताना एक विशेष काळजी घ्या, त्यात आपले अर्धे बोट बुडले जाईल, इतकेच पाणी घाला. पाणी जास्त झाल्यामुळे अनेकदा भात कुकरच्या भांड्यामधून बाहेर येते. एवढे प्रमाण लक्षात ठेवले की, भात आणि डाळ कुकरच्या भांड्यातून बाहेर येणार नाही. शिवाय भात परफेक्ट मऊ मोकळा शिजेल.

कुकर वापरताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्या?

- कुकरच्या शिट्टीतून पाणी किंवा अन्न, बाहेर येऊ नये असे वाटत असेल तर, वेळोवेळी कुकर साफ करावा. प्रत्येकी ३ महिन्यानंतर प्रेशर कुकर चेक करावा.

हात न लावता पीठ मळता येते? एक ट्रिक-२ मिनिटात पीठ मळण्याची सुपरफास्ट पद्धत

- शिट्टी साफ करण्यासाठी शिट्टी गरम पाण्यात बुडवून ठेवा, नंतर शिट्टी साफ करा. यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.

- प्रेशर कुकरमध्ये अन्न नेहमी लो किंवा मध्यम आचेवर शिजवावे.

Web Title: How to Cook Rice in an Indian Style Pressure Cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.