वरण भात हा प्रत्येक खाण्यातील महत्वाचा भाग आहे. (Cooking Hacks) पाणी, तांदळाचे व्यवस्थित प्रमाण ठेवूनही भात व्यवस्थित शिजत नाही, गचका राहतो अशी अनेकांची तक्रार असते. प्रेशर कुकरमध्ये एकदम मऊ भात कसा शिजवायचा याची सोपी रेसिपी पाहूया. चपात्या करण्याप्रमाणे भात बनवणं हे सुद्धा किचकट काम आहे. (How to Cook Rice in Cooker)
भात शिजवण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल तेव्हा मऊ-मोकळा भात बनतो. यासाठी प्रेशर कुकरमध्ये भात लावताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (How to Cook Rice In an Indian Style Pressure Cooker Water) कारण कुकरमध्ये वाफ आतमध्ये दाबली जाते. ही वाफ आतमध्ये व्यवस्थित तयार झाल्यास जेवण व्यवस्थित शिजतं. (Right Way to Make Rice in Cooker How to Make Rice With Cooker)
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये पब्लिश झालेल्या रिसर्चनुसार तांदूळातील ग्लायसेमिक रिस्पान्स महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. हा रिसर्च डेटा २३ ते ५४ वर्षांच्या महिला आणि मुलांवर करण्यात आला होता. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवणं खूपच सोपं आहे. यात लवकर भात तयार होतो. गॅसची बचत होते, चव वाढते, प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात तुम्ही तूपाबरोबर किंवा इतर अन्य डिशेजबरोबरही खाऊ शकता.
भात शिजवण्याची योग्य पद्धत (What Is Right Way to Cook Rice)
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवताना त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून अर्ध्या तासासाठी भिजवायला ठेवा. अर्ध्या तासाने तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या. नंतर प्रेशर कुकरमध्ये तांदूळ दुप्पट उकळत्या पाण्यात घाला.तांदूळ मऊ-मोकळे शिजावेत यासाठी भात करताना त्यात अर्धा लिंबाचा रस आणि १ टिस्पून तेल घाला. ज्यामुळे तांदूळ-मोकळे शिजतील.
तांदूळ चांगल्या क्वालिटीचे असावेत (Correct Way to Cook Rice)
तुम्ही भात बनवण्याचे प्लॅनिंग करत असाल तर थोडे महागडे तांदूळ निवडा. खासकरून बासमती तांदूळ एकदम मऊ-मोकळे शिजतात. तुम्ही बासमीत तांदूळांचीच निवड करा.
दातांना आतून किड लागलीये-पिवळट दिसतात? ५ पदार्थ चावून खा, किड निघेल-स्वच्छ होतील दात
मिडीयम फ्लेमवर शिजवा
तांदूळ नेहमी मीडियम फ्लेमवरच शिजवायला हवा. तांदूळ शिजल्यानंतर कुकरच्या तळव्याला चिकटू नयेत यासाठी तूपाची फोडणी द्या. कुकरमध्ये भात लावताना कुकरमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी भरून नका. अन्यथा भात गचगचीत होऊ शकतो.