Lokmat Sakhi >Food > पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही

पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही

How to Cook Rice Without a Rice Cooker : प्रेशर कुकरमध्ये न लावताही भात झटपट शिजवता येतो, पाहा भन्नाट ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2023 03:39 PM2023-12-08T15:39:40+5:302023-12-08T15:40:23+5:30

How to Cook Rice Without a Rice Cooker : प्रेशर कुकरमध्ये न लावताही भात झटपट शिजवता येतो, पाहा भन्नाट ट्रिक

How to Cook Rice Without a Rice Cooker | पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही

पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही

भारतीय लोकांना भात-डाळ (Daal-Rice) शिवाय जमत नाही. ताटात भात-डाळ असेल तर, पोट भरलेले राहते. शिवाय लवकर भूकही लागत नाही. लहानपणापासून आपल्याला भात-डाळ खाण्याची सवय लावण्यात आलेली असते. भारतात आपल्याला विविध प्रकारचे तांदूळ आढळतील, प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार तांदुळाची (Rice) निवड करतात. पण भात तयार करण्यासाठी बहुतांश घरांमध्ये प्रेशर कुकरचा वापर होतो.

पण भात शिजवण्यासाठी प्रेशर कुकरशिवाय (Pressure Cooker) आपण इतर भांड्यांचाही वापर करू शकता. प्रेशर कुकरपेक्षा एखाद्या भांड्यामध्ये भात शिजवणे उत्तम मानले जाते. प्रेशर कुकरमध्ये भात झटपट शिजतो, पण त्याचे इतरही काही तोटे आहेत. त्यामुळे प्रेशर कुकरशिवाय इतर भांड्यामध्ये भात कसे शिजवावे? (Cooking Tips) भात मोकळा-सुटसुटीत तयार करण्यासाठी कोणती ट्रिक उपयुक्त ठरेल? पाहूयात(How to Cook Rice Without a Rice Cooker).

प्रेशर कुकरमध्ये भात शिजत घालण्याचे तोटे

प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने गॅसची बचत होते. त्याची चव जास्त चांगली लागते. पण फायद्यासह त्याचे तोटे देखील आहेत. प्रेशर कुकरमध्ये भात शिजत घातल्यास त्यातील स्टार्च बाहेर पडत नाही. प्रेशर कुकरच्या आतील दाबामुळे ते भातात मिसळते, त्यामुळे भात अधिक फॅटी होतो. शिवाय भात चिकटही तयार होतो. प्रेशर कुकरमध्ये शिजलेला भात खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. ज्यामुळे वजन वाढू शकते.

हिवाळ्यात गरमागरम सिंधी कढी खाऊन तर पाहा, तोंडाला चव येईल असा भन्नाट पदार्थ

प्रेशर कुकरशिवाय भांड्यामध्ये भात शिजवण्याची ट्रिक

चांगल्या प्रतीचा तांदूळ निवडा

बरेच जण आपल्या आवडीनुसार तांदुळाची निवड करतात. पण तांदूळ निवडताना त्याची क्वालिटी तपासा. तांदूळ शिजत घालण्यापूर्वी एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात २ कप पाणी घालून ३ ते ४ वेळा धुवून घ्या. धुतल्यानंतर १५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेऊन द्या. १५ मिनिटानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्या, व त्यात गरजेमनुसार पाणी घालून भात शिजवण्यासाठी ठेवा. या ट्रिकमुळे भात मोकळा व्यवस्थित फुलेला तयार होईल, शिवाय कमी वेळात शिजेल.

भात शिजत घालण्याची दुसरी पद्धत

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घाला. मध्यम आचेवर भात शिजवून घ्या. यामुळे भात लवकर शिजेल, शिवाय मोकळा तयार होईल.

कडधान्य-पालकाची भाजी नेहमीचीच, करून पाहा पौष्टीक कुरकुरीत डोसा, ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज-ना इनोचा वापर..

फ्लेवर अॅड करा

भातामध्ये अधिक चव हवी असल्यास आपण त्यात वेलची, मीठ, तमालपत्र, खडा मसाला घालू शकता. यामुळे भाताला जबरदस्त चव येईल. शिवाय आपण त्यात तूपही घालू शकता.

Web Title: How to Cook Rice Without a Rice Cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.