तांदूळ हा सर्वांच्याच आहारातील मुख्य घटक आहे. काहीजणांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही. रोजच्या जेवणात भात असला तरी बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहीजण प्रेशर कुकरमध्ये तर काहीजण पातेल्यात भात शिजवतात. (Which is the best way to cook rice)
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात तांदळाच्या ग्लायसेमिक रिस्पॉन्सचा महिलांच्या आरोग्यावर काय परीणाम होतो यावर अभ्यास करण्यात आला होता. (How to cook white rice easily and perfectly) रिसर्च डेटात २३ ते ५४ वर्ष वयोगटातील महिलांचे मेडिकल रिपोर्ट्स पाहण्यात आले होते. (How to cook rice in rice step by step)
यावेळी, भात खाल्ल्यानंतर ३० मिनिटांनी सहभागींच्या ग्लुकोजच्या पातळीची चाचणी घेण्यात आली. यामध्ये नॉन प्रेशर कुक्ड भात खाल्ल्यानंतर ग्लुकोजची पातळी थोडी जास्त झाल्याचे समोर आले. शिवाय, प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या भातामध्ये किंचित जास्त कॅलरीज होत्या. (How to cook white rice easily and perfectly)
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवण्याचे फायदे-तोटे
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवणे खूप सोपे आहे आणि भात खूप लवकर शिजतो. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने गॅसची बचत होते. त्याची चव जास्त चांगली असते. प्रेशर कुकरमध्ये बनवलेला भात अनेक रेसेपिजसाठी वापरला जाऊ शकतो. पण प्रेशर कुकरमध्ये भात शिजवत असल्यास त्यातील स्टार्च बाहेर पडत नाही. त्यामुळे तांदूळ अधिक फॅटी होतो. प्रेशर कुकिंगमुळे अनेक आवश्यक पोषक घटक काढून टाकले जातात.
पातेल्यात शिजवलेला भात खाण्याचे फायदे-तोटे
त्यात कमी कॅलरीज असतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी पातेल्यात शिजवलेला भात खावा. यात स्टार्चचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मधुमेह असलेल्यांना हा भात खाण्याचा सल्ला दिला जातो.तांदूळ उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून दिले. त्यामुळे तांदूळ अधिक पौ।ष्टीक होतो. या पद्धतीनं भात बनवताना गॅस आणि वेळ जास्त लागतो. यात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात.