Join us  

भात गचकाही नको आणि फडफडीतही नको? मग भात शिजवताना लक्षात ठेवा ३ ट्रिक, भात होईल मऊ-मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:00 PM

How to Cook White Rice : जेवण बनवताना काहीवेळा तांदूळ चिकट राहतात तर कधी मोकळे शिजत नाहीत. खासकरून जेव्हा पाहूणे आले असतील तेव्हा तांदूळ मऊ, मोकळा शिजावा असं वाटतं. जेणेकरून वाढतानाही आपल्याला तितकंच छान वाटेल.

भारतातल्या प्रत्येक राज्यात  तांदूळ खाल्ला जातो. (Rice) अनेक भागात  डाळ भात, बिर्याणी, पुलाव, कढी चावल अशा पारंपारीक पदार्थांसाठी तांदळाचा वापर केला जातो. पदार्थ कोणताही असला तरी तांदूळ मोकळे शिजले नसतील तर जेवण अपूर्ण वाटतं. (How To Cook Rice Perfectly and Easily)

जेवण बनवताना काहीवेळा तांदूळ चिकट राहतात तर कधी मोकळे शिजत नाहीत. खासकरून जेव्हा पाहूणे आले असतील तेव्हा तांदूळ मऊ, मोकळा शिजायला हवा असं वाटतं. जेणेकरून वाढतानाही आपल्याला तितकंच छान वाटेल. तांदळात पाणी घालण्याचं प्रमाण चुकलं किंवा तांदळांची निवड चुकली तर भात गचका किंवा खराब होतो. (How to Cook Perfectly Fluffy Rice Every Time)

भात शिजवण्याची योग्य पद्धत

तांदूळ शिजवण्यात पाण्याची महत्वाची भूमिका असते.  जर योग्य प्रमाणात पाणी मिसळलं तर तांदूळ मोकळा शिजेल. पण  मोजून मापून पाणी घातलं नाही तर भात बिघडू शकतो. जितका भात घ्याल त्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी घ्या. जर तुम्ही पातेल्यात भात शिजवत असाल तर एक वाटी तांदळासाठी २ वाटी पाणी घ्या. जर तुम्ही कुकरमध्ये भात शिजवत असाल तर एक वाटी तांदळात दीड वाटी पाणी मिसळा असं केल्यानं भात मोकळा, परफेक्ट शिजेल.  

भातात लिंबाचा रस मिसळा

भात बनवताना त्यात थोडा लिंबाचा रस आणि चिमुटभर मीठ मिसळा यामुळे तांदूळ पांढरेशुभ्र आणि मोकळे शिजतील. जर तुम्हाला वाटत असेल की लिंबू मिसळल्यानं तांदूळ आंबट होतील तर असं अजिबात होणार नाही. लिंबाचे काही थेंब संपूर्ण भाताला आंबट बनवत नाहीत. जर तुम्ही कुकरमध्ये भात शिजवत असाल तर एक शिट्टी घेतल्यानंतर गॅस मंच आचेवर ठेवा आणि ५ मिनिटांपर्यंत शिजवा.  जर तुम्ही पातेल्यात भात शिजवत असाल तर एक  उकळ आल्यानंतर तांदूळ मंद आचेवर ठेवून शिजवा.

बटर किंवा तूप मिसळा

तांदूळ शिजवण्याआधी व्यवस्थित धुवून घ्या. असं केल्यानं तांदळातील स्टार्च निघून जातील. ज्या भांड्यात तुम्ही भात शिजवणार आहात त्याला बटर किंवा घी व्यवस्थित लावून घ्या. यामुळे तांदूळ मऊ आणि स्वादीष्ट बनतील. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न